Posts

Showing posts from April, 2024

तीर्थ - गंगातीर्थ

Image
  गंगातीर्थ           गंगातीर्थे हे जाणिवेचे, समजुतीचे तीर्थ आहे. समज निर्माण झाली पाहिजे. समज आणि ज्ञान यात फरक आहे. ज्ञानियांचे घरी भक्तीचा दुष्काळ| केवळ ज्ञान्याला फार मोठी किंमत नाही. ज्ञानासोबत समज असली पाहिजे. भगवान् सर्वव्यापक आहे हे ज्ञान आहे. खरोखर, या जगात मुंगी देखील भगवतशक्तिशिवाय हलू शकत नाही, हे ज्ञान आहे. मी सुद्धा भगवतशक्तिशिवाय हलू शकत नाही, ही गोष्ट माणूस विसरून जातो. सृष्टी माझ्यापासून सुरू होते. मी माझा हात उजवीकडून डावीकडे हलवतो हे सुद्धा भगवंत शक्तीने. अर्थात् भगवंत माझ्या सोबत आहे, माझ्यात आहे, माझ्याजवळ आहे. ही समज ज्यांना आली ते लोक हळूहळू सुखप्रवाह आणि प्रेमप्रवाहातला फरक समजू शकतात.            आपण बोलतो की भगवंत सर्वत्र आहे, नदीत आहे, समुद्रात आहे, पर्वतात आहे, सर्वच ठिकाणी आहे. सर्वत्र भगवंत असेल तर माझ्यात कसा नसेल? माणसाला सर्वांच्यात भगवंत आहे ही समज आली आहे तरीही तो रडतो आहे. सर्वांच्यात भगवंत असेल तर मला सोडून भगवंत कसा राहील? स्वतःमध्ये सुद्धा भगवंत आहे याचा विचारच माणूस करत नाही. म...

तीर्थ - साधव: सत्यतीर्थे

 2. साधव: सत्यतीर्थे                सामान्यतः सरळ माणसे सत्याला धरून असतात. सत्य म्हणजे प्रामाणिक, खरा. सत्यावर प्रेम करायचे, इथपासून सत्याची सुरुवात होते. सत्य कोण? राम सत्य की काम सत्य? काम सत्य असू शकत नाही. तुमचा उत्कृष्ट बंगला, चांगल्यात चांगला सोफा, गाद्या , एअर कंडिशनर रूम अशा ज्या काही सुख सुविधा आहेत त्या सगळ्या काम मध्ये येऊन जातात. डोळे मिटल्यानंतर यापैकी काही असत नाही. परंतु राम नसेल तर? तुम्हीच राहणार नाहीत. माणसाने सत्यान्वेषी असले पाहिजे. तर तो खरा माणूस. तशाचप्रकारे माणसाने प्रामाणिक असले पाहिजे.            गर्भोपनिषदात सांगितले आहे त्याप्रमाणे आपण भगवंताला कबूल केले आहे. सातव्या महिन्यात गर्भाला ज्ञान होते. गर्भ बेचैन होतो. सातव्या महिन्यात जीव, समज येण्याच्या स्थितीत येतो. तोपर्यंत बुद्धी विकसित झालेली नसते. सातव्या महिन्यात जन्मलेले मूल जगू शकते. ते मोठे देखील होते. सातव्या महिन्यात त्याला ज्ञान होते तेव्हा तो गर्भ भगवंतासोबत करार करतो. यात श्रुतीप्रमाण्य मानले पाहिजे. याचे कारण असा करार झाल्या...

तीर्थ - विद्यातीर्थ

Image
                  आपण सध्या बाल वर्गात असू, पण कर्मचा स्थितीवर जाण्याचा विचार तर असावा ना? त्यासाठी सप्तकुंडात स्नान करायचं. ही सप्तकुंडे कोणती?             विद्यातीर्थ जगति विबुधा: साधव: सत्यतीर्थ गंगातीर्थे मलिनमनसो योगिनो ध्यानतीर्थे|              धारातीर्थे धरणिपतयो दानतिर्थे धनाढ्या: लज्जातीर्थे कुलयुवतय: पातकं क्षालयन्ति||                                                                                               या सप्तकुंडात न्हावे लागेल. 1.  विद्यातीर्थ                हे पहिले तीर्थ आहे. त्यात जोपर्यंत आपण न्हात नाही तोपर्यंत पुढे जायचा रस्ताच मिळत नाही. आपले जीवन कशाने बदलते? विचारानी बद...

भगवंत वात्सल्य कसे जागृत करतो ?

Image
भगवंताचे संभाळणे              सोळा वर्षाच्या मुलींमध्ये आजपर्यंत वात्सले नव्हते, तिचे लग्न झाले, तिला पुढे जाऊन बाळ झाले म्हणजे वात्सले आलेच. ते कोठून आले? ते बाहेरून नाही आले, आतूनच आले. आत वात्सल्य ठेवले कोणी? भगवंतानेच ठेवलं. त्याला विविध आवाजाच्या तालावर रास खेळायचा आहे आणि नाचायचे आहे. कधी राग, कधी प्रेम, कधी भाव, कुठला रस केव्हा घ्यायचा, केव्हा विकसित करायचा ते मुरली वाजवणाऱ्याला माहित आहे. एखादा माणूस सकाळी सहा ते सात स्तोत्र म्हणत असेल. विष्णुसहस्रनाम जपत असेल, आणि दहा वाजता कोणाशी भांडत असेल की ही काय तुझ्या बापाची मिळकत आहे. हे वेगवेगळे आवाज काढणारा कोण आहे. हे ज्यांना कळले ते निर्भय. बाकीचे सर्व भयभीत होऊन जगात फिरत आहेत. माणसाला जीवनाच्या बाबतीत, जगदीशच्या बाबतीत, जगताच्या बाबतीत जो काही संशय असेल तो ह्या ज्ञानाने फिटून जातो.           ज्ञानाने कोणता संशय जातो? मी आहे, हा एक संशय आहे. आणि देह माझा आहे, हा दुसरा संशय आहे. ज्ञानाने दोन्ही संशय निघून जातात. आणि हे निशंक लोक योग साधून भगवंताशी जोडले जातात.

मानवाचा भगवंतावर असलेला आढळ विश्वास.

Image
अढळ विश्वास            भगवंता बरोबर हातात हात देऊन चालतात. पत्नीने पतीच्या हातात हात दिल्यावर सगळी जबाबदारी पतीची! पत्नीची नाही. पती सांगेल तीथे ती सही करते. सही कर, म्हणाला तर पत्नी कागद वाचत नाही ती म्हणते, 'कागद तुम्ही वाौचा, तुम्ही म्हणाल तिथे मी सही करते. सगळी जबाबदारी तुमची आहे.' काही उलट सुलट झाले तर लगेच पतीला म्हणते, तुम्ही वाचायला पाहिजे होते .मी तर तुम्ही सांगितले तिथे सही केली.आता जे भोगावे लागेल त्याला मी जबाबदार नाही.'         भक्त भगवंताला म्हणतात, 'तू सही करायला सांगितली तिथे आम्ही सही केली. तुम्ही जे काम करायला सांगितले ते केले. आता त्याची जबाबदारी तुझी आहे .आमची नाही.         तिसरी गोष्ट अशी आहे की दुसरा मानव आहे. इथे अद्वैत आले . मला जे पाहिजे ते दुसऱ्याला पण पाहिजे. अव्दैत आणि वेदांत फक्त पुस्तकात ठेवून चालणार नाही. माझ्यातील लहानात लहान गुण असेल त्याची कोणी प्रशंसा केली तर मला आवडते की नाही? मला आवडते. मग दुसऱ्याच्या लहानातील लहान गुणांची तारीफ माझ्याकडूनही झाली पाहिजे. मला कोणी तुच्छ...

हनुमान जयंती - हनुमानाच्या जीवनात रामाचे असलेले स्थान.

Image
हनुमान जयंती  हनुमान रामाचा पूर्ण भक्त होता              हनुमंता जवळ स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञाशक्ती होती. अशोकवाटिकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या सीतेला प्रभू रामचंद्रचा समाचार सांगण्यापूर्वी त्याने झाडामागे उभे राहून इक्ष्वाकुळाचे वर्णन सुरू केले. हनुमंताने मानसिक भूमिका तयार करून सीतेच्या हृदयात विश्वास निर्माण केला; त्यानंतरच रामदूत म्हणून स्वतःचा परिचय करून दिला.             लंका-दहन हे काही हनुमंताची माकड चेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पूर्ण विचार करून केलेले कृत्य होते. लंका दहनांमध्ये पूर्ण राजनीती आहे. त्याच्याद्वारे त्याने लंकेतील राक्षस प्रजेचा आत्मप्रत्यय खलास केला. लंका दहन करून हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पुरे केले आहे.            हनुमान रामाचा पूर्ण भक्त होता. तो प्रत्युत्पन्नमती होता. रामाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता‌. रावणाला मारल्यानंतर सीतेला संदेश पोहोचविण्यासाठी राम हनुमंताला पाठवतो. कारण आनंदाचा समाचार सरळ कळला तर कदाचित हृदय बंद पडून जाईल‌...

मानसशास्त्राचा अभ्यासक हनुमान

      मानसशास्त्राचा अभ्यासक हनुमान                  हनुमान जयंती साजरी केली जाते. कारण हनुमंताने स्वतःच्या अंतर्भाह्य शत्रूवर विजय मिळविला होता, इंद्रजीतासारख्या बाह्य शत्रूला तर या इंद्रियजीत हनुमंताने जिंकलेच होते पण मनामध्ये असलेल्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी असुरावरही त्याने विजय प्राप्त केला होता. सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला त्यावेळी अनेक सुंदर स्त्रियांना त्याने पाहिले होते पण त्याचे मन चलित झाले नाही. भगवान रामासारखा खजिना ज्याला प्राप्त झाला होता त्याला आणखी संसारे सुखसंपत्तीचा लोभ कोठून असणार! स्वतः जे काही केले आहे ते रामाच्या शक्तीमुळेच घडलेले आहे अशी अंतकरणापासूनची भावना जेथे असेल तेथे मद व अभिमान कोठून संभवतील!             हनुमान बल-बुद्धी- संपन्न होता. त्याला मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्त्वज्ञान वगैरे शास्त्राचे सखोल ज्ञान होते. त्याला अकरावा व्याकरणकार व रुद्राचा अवतार मानन्यता येते त्याच्यात फार मोठी विद्वाता होती. त्याची वकृत्व-शक्ती देखील अजब होती. हनुमंताच्या ...