मानवाचा भगवंतावर असलेला आढळ विश्वास.

अढळ विश्वास 
          भगवंता बरोबर हातात हात देऊन चालतात. पत्नीने पतीच्या हातात हात दिल्यावर सगळी जबाबदारी पतीची! पत्नीची नाही. पती सांगेल तीथे ती सही करते. सही कर, म्हणाला तर पत्नी कागद वाचत नाही ती म्हणते, 'कागद तुम्ही वाौचा, तुम्ही म्हणाल तिथे मी सही करते. सगळी जबाबदारी तुमची आहे.' काही उलट सुलट झाले तर लगेच पतीला म्हणते, तुम्ही वाचायला पाहिजे होते .मी तर तुम्ही सांगितले तिथे सही केली.आता जे भोगावे लागेल त्याला मी जबाबदार नाही.'
        भक्त भगवंताला म्हणतात, 'तू सही करायला सांगितली तिथे आम्ही सही केली. तुम्ही जे काम करायला सांगितले ते केले. आता त्याची जबाबदारी तुझी आहे .आमची नाही.
        तिसरी गोष्ट अशी आहे की दुसरा मानव आहे. इथे अद्वैत आले . मला जे पाहिजे ते दुसऱ्याला पण पाहिजे. अव्दैत आणि वेदांत फक्त पुस्तकात ठेवून चालणार नाही. माझ्यातील लहानात लहान गुण असेल त्याची कोणी प्रशंसा केली तर मला आवडते की नाही? मला आवडते. मग दुसऱ्याच्या लहानातील लहान गुणांची तारीफ माझ्याकडूनही झाली पाहिजे. मला कोणी तुच्छ समजलं तर मला चालत नाही, आवडत नाही. तर मग मी दुसऱ्याला तुच्छ समजू नये. हा वेदांत आहे. काही लोक दोषच बघतात. दुसऱ्यांने काही दिले तर त्याची कदर करायची सोडा, वर कोणी त्याची प्रशंसा केली तर म्हणतात, त्याच्या जवळ जास्त होते म्हणून दिले, त्यात काय?
          मी मानव आहे याचा अर्थ काय? पशुत्व काढून बाकी राहते ते मानव्य. माझ्यातून पशुत्व काढले पाहिजे आणि दुसऱ्यातून पण पशुत्व काढले पाहिजे. मानवात भगवान राहतो. दुसऱ्यात भगवान बघायचा असेल तर त्याला पशुत्वापासून वेगळे करावे लागेल. दुसऱ्याला पशुत्वापासून वेगळे करावे . हा भक्तीचा विषय आला आहे . त्यासाठी उठून मानव समाजात फिरावे लागेल. त्यानंतर दुसऱ्याला प्रेम आणि आदर दिला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन