मानसशास्त्राचा अभ्यासक हनुमान
मानसशास्त्राचा अभ्यासक हनुमान
हनुमान जयंती साजरी केली जाते. कारण हनुमंताने स्वतःच्या अंतर्भाह्य शत्रूवर विजय मिळविला होता, इंद्रजीतासारख्या बाह्य शत्रूला तर या इंद्रियजीत हनुमंताने जिंकलेच होते पण मनामध्ये असलेल्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी असुरावरही त्याने विजय प्राप्त केला होता. सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला त्यावेळी अनेक सुंदर स्त्रियांना त्याने पाहिले होते पण त्याचे मन चलित झाले नाही. भगवान रामासारखा खजिना ज्याला प्राप्त झाला होता त्याला आणखी संसारे सुखसंपत्तीचा लोभ कोठून असणार! स्वतः जे काही केले आहे ते रामाच्या शक्तीमुळेच घडलेले आहे अशी अंतकरणापासूनची भावना जेथे असेल तेथे मद व अभिमान कोठून संभवतील!
हनुमान बल-बुद्धी- संपन्न होता. त्याला मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्त्वज्ञान वगैरे शास्त्राचे सखोल ज्ञान होते. त्याला अकरावा व्याकरणकार व रुद्राचा अवतार मानन्यता येते त्याच्यात फार मोठी विद्वाता होती. त्याची वकृत्व-शक्ती देखील अजब होती. हनुमंताच्या वाणीतून ज्ञाननिष्ठ वैचारिक प्रवाह आणि सरळ पण अर्थगंभीर भाषाप्रवाह वाहत आहे असे.
हनुमंताचा मानसशास्त्राचा फारच सखोल अभ्यास होता. त्याच्या मुत्सद्दीगिरीवर व विव्दत्तेवर रामाचाही अद्भुत विश्वास होता. बिभीषन शत्रू राज्याचा सचिव व रावणाचा भाऊ रामाकडे येतो. तो कोणत्या हेतून आला आहे, त्याला स्वपक्षात घ्यायचे की नाही; याबाबतीत रामाने सल्ला विचारताच सुग्रीवापासून प्रत्येकाने अशा अटीतटीच्या वेळी बिभीषणाचा स्वीकार करायला नकार दिला. सर्वांचे ऐकून घेतल्यावर रामाने हनुमंताचे मत विचारले. हनुमंताने तात्काळ त्याचा स्वीकार करावा असे मत दिले. रामाने हनुमंताचे मत मान्य केले. कारण माणसाला ओळखण्याची हनुमंताची शक्ती राम जाणत होता.
सीता संशोधनाचे कार्य देखील रामाने जेवढ्या विश्वासाने त्याच्यावर सोपविले होते, तेवढ्याच विश्वासाने त्यांनी ते कार्य पारही पाडले. सुंदर कांड नवंताच्या लीलानेच भरलेले आहे. भगवद्भक्ताची लीला प्रभूला आणि तप:स्वाध्यायनिरत ऋषींनाही सुंदर वाटते. म्हणूनच ज्या कांडात हनुमंताची लिला आहे त्याचे नाव सुंदरकांड ठेवले आहे.
Comments
Post a Comment