तीर्थ - साधव: सत्यतीर्थे
2. साधव: सत्यतीर्थे
सामान्यतः सरळ माणसे सत्याला धरून असतात. सत्य म्हणजे प्रामाणिक, खरा. सत्यावर प्रेम करायचे, इथपासून सत्याची सुरुवात होते. सत्य कोण? राम सत्य की काम सत्य? काम सत्य असू शकत नाही. तुमचा उत्कृष्ट बंगला, चांगल्यात चांगला सोफा, गाद्या , एअर कंडिशनर रूम अशा ज्या काही सुख सुविधा आहेत त्या सगळ्या काम मध्ये येऊन जातात. डोळे मिटल्यानंतर यापैकी काही असत नाही. परंतु राम नसेल तर? तुम्हीच राहणार नाहीत. माणसाने सत्यान्वेषी असले पाहिजे. तर तो खरा माणूस. तशाचप्रकारे माणसाने प्रामाणिक असले पाहिजे.
गर्भोपनिषदात सांगितले आहे त्याप्रमाणे आपण भगवंताला कबूल केले आहे. सातव्या महिन्यात गर्भाला ज्ञान होते. गर्भ बेचैन होतो. सातव्या महिन्यात जीव, समज येण्याच्या स्थितीत येतो. तोपर्यंत बुद्धी विकसित झालेली नसते. सातव्या महिन्यात जन्मलेले मूल जगू शकते. ते मोठे देखील होते. सातव्या महिन्यात त्याला ज्ञान होते तेव्हा तो गर्भ भगवंतासोबत करार करतो. यात श्रुतीप्रमाण्य मानले पाहिजे. याचे कारण असा करार झाल्याचे तुम्हाला माहित नाही आणि मलाही माहित नाही. जीव भगवंताला विनवतो, 'भगवंता तू मला इथून सोडव.' भगवंत विचारतो , तर तू काय करशील? 'भगवंता! तुझे काम करील . तुझ्यासोबत राहीन, तुझ्या प्रति भाव वाढविन, तुला सांभाळेन .' भगवान म्हणतो, 'असे! तर मी तुला, तू जगशील तोवर सांभाळेन.' भगवंताचे काम काय? लोकांना सुखी करणे हे भगवंताचं काम. लोकांना सुखाची दृष्टी दिली पाहिजे. भगवंताला जीव वचन देतो खरा पण जन्मल्यावर दिलेले वचन विसरून जातो. सृष्टीत आल्यावर सगळा झाकपाक पाहिल्यावर दिलेलं वचन विसरून जातो. त्यानंतर एखादा आपल्यापाशी येतो आणि हलवतो , ' अरे उठ. तू काहीतरी वाच. उपनिषद वाच.
माझे काय हे समजण्याची अक्कल असली पाहिजे आणि भाव असला पाहिजे. हे सगळे भगवंताचे आहे आणि मी सांभाळतो आहे .माझ्यासाठी भगवंताने सारे केले. अशाप्रकारे शेवटी भक्ती आलीच. 'त्याचा' होणे आले. सत्य म्हणजे मालकीची भावना कमी होणे.
Comments
Post a Comment