भगवंत वात्सल्य कसे जागृत करतो ?

भगवंताचे संभाळणे
             सोळा वर्षाच्या मुलींमध्ये आजपर्यंत वात्सले नव्हते, तिचे लग्न झाले, तिला पुढे जाऊन बाळ झाले म्हणजे वात्सले आलेच. ते कोठून आले? ते बाहेरून नाही आले, आतूनच आले. आत वात्सल्य ठेवले कोणी? भगवंतानेच ठेवलं. त्याला विविध आवाजाच्या तालावर रास खेळायचा आहे आणि नाचायचे आहे. कधी राग, कधी प्रेम, कधी भाव, कुठला रस केव्हा घ्यायचा, केव्हा विकसित करायचा ते मुरली वाजवणाऱ्याला माहित आहे. एखादा माणूस सकाळी सहा ते सात स्तोत्र म्हणत असेल. विष्णुसहस्रनाम जपत असेल, आणि दहा वाजता कोणाशी भांडत असेल की ही काय तुझ्या बापाची मिळकत आहे. हे वेगवेगळे आवाज काढणारा कोण आहे. हे ज्यांना कळले ते निर्भय. बाकीचे सर्व भयभीत होऊन जगात फिरत आहेत. माणसाला जीवनाच्या बाबतीत, जगदीशच्या बाबतीत, जगताच्या बाबतीत जो काही संशय असेल तो ह्या ज्ञानाने फिटून जातो.
          ज्ञानाने कोणता संशय जातो? मी आहे, हा एक संशय आहे. आणि देह माझा आहे, हा दुसरा संशय आहे. ज्ञानाने दोन्ही संशय निघून जातात. आणि हे निशंक लोक योग साधून भगवंताशी जोडले जातात.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन