Manifestation Affirmations | सिद्धीच्या सकारात्मक पुष्टि
जगातली कीर्ती मिळते. जगातली कीर्ती मिळाली की सगळी दुनिया कीर्ती देते आहे असं समजून आपण जगदीशाला विसरतो. खरं तर जी गोष्ट सामान्य कुत्राही करत नाही ती आपण करतो आणि स्वतःला शहाणे समजत असतो हेच एक आश्चर्य आहे! कुत्र्याला तुम्ही काठी मारली तर कुत्रा काठीला चावतो की तुम्हाला? तुम्हाला चावतो. कारण त्याला हे कळतं की मला काठीचा मार माणसामुळे मिळाला आहे. एवढं साधं logic - तर्क सामान्य कुत्र्याकडे आहे, परंतु तेही शंकररावाकडे नाही. त्याला लोकांकडून कीर्ती लाभू लागली की तो लोकांची पूजा करू लागतो. अरे लोकांनी कीर्ती दिली, जगाने कीर्ती दिली याचं खरं कारण जगदीश आहे. पण हे तो विसरतो. त्यामध्ये logic तर्क कनेक्ट चालवतच नाही तो. अशा बथ्थड शंकररावाबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतं की I pity him त्याची कीव करायला हवी. किंवा करण्यासारखा कोणी प्राणी असेल तर तो हा मानवप्राणीच होय. कारण की त्याची अक्कल क्षणाक्षणाला कमी कमीच होत जाते आहे. तेव्हा त्याची उरली सूरली अक्कल केव्हा नाहीशी होईल याचा काही नियम नाही. जगातली कीर्ती मिळताच माणसाला लोकांचे पाय धरण्याची इच्छा होते आणि तो जगदीशाला पार ...