Fearless attitude/mindset | निर्भयवृत्ती
जीवनात जर निर्भयवृत्ती आली तर उन्मतपणा येण्याचाही संभव आहे. माणूस श्रेष्ठ बनला की मग आध्यात्मिक दृष्टीने त्याला दुसऱ्याची क्षुद्रता येऊ लागते. अध्यात्मिक श्रेष्ठता मिळू लागली की त्याचा अहंकार पुष्ट होतो आणि मग विस्तीर्ण प्रतिष्ठा त्याला मिळू लागते. अहो लोक भगवान म्हणूनच त्याची पूजा करू लागतात. मग त्याला स्वतःला देखील वाटायला लागतं की, 'मला देव मानून लोक पाया पडतात म्हणजे माझ्यात काहीतरी दिव्यत्व नक्कीच असलं पाहिजे. मी नक्कीच देव असलो पाहिजे.' हे सर्व त्यातले दोष आहेत. अध्यात्मिकतेत माणसाने अतिशय खंबीरपणे प्रगतीपथावर चालण्याची गरज असते.
विश्वातल्या भोगामध्ये नश्वरता आहे हे ध्यानात घेऊन हे भोग आपल्या खिशात ठेवून आत्मज्ञानाची चर्चा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे प्राप्त झालं ते खिशात ठेवा आणि जे मिळालं नाही त्याच्यासाठी प्रयत्न करा. हेच जीवन आहे. कोणताही भोग आपल्या जवळ राखण्यात काही गैर नाही. मात्र त्याच्यासोबत यमराजाने सांगितलेला कानमंत्र महत्त्वाचा आहे. यमराज सांगतात की, अधृवात ध्रुव पहा,' याचा अर्थ अध्रुव टाकून द्या असं ते सांगत नाहीत. असा विधायक दृष्टिकोन उपनिषदांनी सांगितला आहे. आणि म्हणूनच उपनिषदांचा उपासक भोगांना भीत नाही. आमच्या देशात धनाची किंवा बळाची निंदा केलेली नाही तर उलट पूजन केलं आहे.
कोणी म्हणेल की, धनिक झाल्यावर माणूस भ्रष्ट होण्याचा प्रसंग आला तर? छे!असं बिलकुल नाही. आपल्याकडचे राजर्षी सुद्धा मुक्त होतात असे आपल्याकडच्या इतिहासात पुष्कळ दाखले आहेत. संपूर्ण विश्वाचे परिपूर्ण सत्ता व संपत्ती पायाशी आलेली असतानाही त्यांना आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. म्हणूनच वैभवाला तुच्छ मानण्याचे कारण नाही. रघुवंशी राजांच्या बाबतीत लक्ष्मीचे वर्णन करताना कालिदासाने सांगितलेच आहे की लक्ष्मी स्वभावात चंचल आहे असा लक्ष्मीवर आरोप ठेवतात पण तो खोटा आहे. उलट लक्ष्मी आल्यावर लक्ष्मीवानच चंचल होतात. मात्र लक्ष्मीवानांवरचा हा आरोप लोक लक्षमीवरच लादत आहे. लक्ष्मी मिळण्यापूर्वीची माणसाची वृत्ती लक्ष्मी प्राप्त झाल्यानंतर तशीच राहत नाही ही वस्तुस्थिती आहे.
येथे एक सखोल विचारशीलता आणि अध्यात्मिक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. निर्भयवृत्ती ही माणसाला मुक्त करू शकते, पण त्याच वेळी अहंकाराच्या सावटाखालीही आणू शकते, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे.
उपनिषदांच्या दृष्टिकोनातून धन, भोग, आणि अध्यात्म यांचा अतिशय समतोल विचार मांडला आहे. विशेषतः "अधृवात ध्रुव पहा" या यमराजांच्या संदेशाचा उल्लेख फार प्रभावी वाटतो. हे दाखवते की, अध्यात्मिक प्रगतीसाठी भोग त्याज्य नाहीत, पण त्यांना योग्य दृष्टिकोनातून पाहायला हवे.
कालिदासाच्या रघुवंश मधील लक्ष्मीच्या स्वभावाविषयीचा दृष्टांतही मार्मिक आहे—लक्ष्मी चंचल नसून, तिचा धारणकर्ता चंचल होतो. हा विचार आजच्या काळातही तितकाच लागू होतो.
Comments
Post a Comment