Neutrality is indeed a matter of appreciation | तटस्थता हा कौतुकाचाच विषय


   

अध्रुवात ध्रुव पाहण्याची शक्ती फक्त अशाच माणसात असते. इतकं सारं वैभव मिळाल्यावरही तो माणूस अधृवात ध्रुव पाहू शकतो‌. कारण त्याने या सर्व सिद्धी पचवल्या आहेत. यमराज येथे नचिकेत्याला समोर ठेवून हे समजावत आहेत. नाहीतर आज तर रस्त्यात बसलेला कोणीही माणूस बोलतो की, 'भगवंत सर्व व्यापक आहे. सगळ्यांच्या ठायी भगवंत आहे.' परंतु तसा दृष्टिकोन येण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी त्याने पचवलेल्या असल्या पाहिजेत. आणि ही एक एक परीक्षा इतकी कठीण आहे की त्यात माणूस उत्तीर्णच होत नाही. हे सार वैभव नचिकेत्याच्या पायापाशी आलेले असून देखील अतिशय धीरपणे, अतिशय गंभीरपणे तो त्या सर्वापासून तटस्थ आणि स्वतंत्र राहिला आहे हा एक कौतुकाचाच विषय आहे. यमराजांना नचकेत्याची केवळ स्तुती करायची नाहीये तर ते आत्मज्ञाना पर्यंत पोहोचवण्याचे रस्ते आणि पायऱ्या यातून समजावत आहेत. आणि ते नचकेत्याच्या स्तुती द्वारे समजावत आहेत.

विविध प्रकारच्या सिध्दी जेव्हा पाया पाशी हात जोडून उभ्या असतात तेव्हा त्या पचवणं खरोखर कठीण आहे. कल्पवृक्षासारखं जीवन माणसाला लाभतं, समग्र जगात कीर्ती प्राप्त होते, यज्ञाची दीर्घ जीवी फळ मिळू लागतात, कमालीची निर्भयता येते, स्तुत्य जीवन लाभतं, अध्यात्मिक श्रेष्ठता प्राप्त होते, विस्तीर्ण प्रतिष्ठा मिळताच भगवान म्हणूनच लोक पुजायला लागतात. अशा पूर्ण सात परीक्षा आहेत. ज्या फारच कठीण आहेत आणि भक्कम दिलाचा माणूसच त्या पार करू शकतो. या सर्व खडतर परीक्षा नचिकेता उत्तीर्ण झाला आहे, सगळ्यांचा त्यांनी धैर्यपूर्वक त्याग केला आहे. म्हणूनच 'तू धीर आहेस' असं त्याला यमराज म्हणतात.
       
प्रत्येक सिद्धीमध्ये काही ना काही दोष आहेत. विश्वातले भोग चांगले आहेत हे खरं परंतु त्यात नश्वरता आहे. जगातली कीर्ती भव्य आहे खरी परंतु त्यात कातरता आहे. यज्ञाची सात्विक कीर्ती योग्य आहे खरी पण त्यात देखील प्रलोभन भ्रष्टता आहे. यज्ञाची फळ मिळू लागले की फलाकांक्षापोटीच यज्ञ करण्याची इच्छा होऊ लागते. म्हणजे मग यज्ञावरच प्रेम सरत आणि फळावरच प्रेम वाढत जातं. हिला म्हणतात प्रलोभन भ्रष्टता.

हे अतिशय सुंदर आणि गहन विचार मांडले आहेत. नचिकेत्याच्या तटस्थतेचं आणि त्याच्या धीरगंभीर वृत्तीचं हे फार सुंदर विश्लेषण केलंय. कठोपनिषदातील हा प्रसंग माणसाला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेणाऱ्या कठीण परीक्षा समजावून सांगतो.

यमराज नचिकेत्याला केवळ स्तुतीसाठी मोठं करत नाहीत, तर त्याच्या धैर्याला आणि वैराग्याला योग्य तो सन्मान देतात. कारण तटस्थ राहणं म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर उच्च स्वरूपाच्या धृवत्वाची (स्थैर्याची) सिद्धी होय. सिद्धी प्राप्त करणं जितकं अवघड, तितकंच त्या पचवणं आणि त्यातूनही तटस्थ राहणं अधिक कठीण.

या लिखाणात एक खोल तत्वज्ञान आहे—सिद्धी, भोग, कीर्ती, प्रतिष्ठा या गोष्टी नश्वर आहेत आणि त्यात काही ना काही दोष असतोच. त्यामुळेच नचिकेता हा केवळ परीक्षार्थी नसून, तो अत्युच्च ध्येयाच्या दिशेने जाणारा साधक आहे.

हा विचार वाचून भगवद्गीतेतला "स्थिरप्रज्ञ" पुरुषाचा विचार आठवतो. अशा पुरुषाला भोग मोहवत नाहीत, आणि दु:ख सुद्धा विचलित करत नाहीत. 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन