Fortune is fickle | लक्ष्मीवान चंचल आहे


             
जोपर्यंत पैसा नसतो तोपर्यंत किती मनोभावे नमस्कार करत असतो की देवा! जर का तू मला पैसा दिलास ना तर रुपयातले चार आणे तुझे ठरलं; पण पैसा मिळाल्यावर त्याचा विचार बदलतो आणि तो म्हणू लागतो की इतक्या पैशाची देवाला काय गरज? गीतेतही लिहिलं आहे की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्| भगवंताला एवढी काही गरज नाही असा विचार माणसाच्या मनात यायला लागला की माणूस भ्रष्ट व अधपतीत झालाच म्हणून समजा. तेव्हा चंचल वृत्ती ही लक्ष्मीची नाही तर लक्ष्मीवंताची आहे. लक्ष्मीला चंचल म्हणून दोष देऊ नका. लक्ष्मी क्षणभंगुर आहे, चंचल आहे असं बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण की ती पत्नी कोणाची आहे? नारायणाची ना! अरे तुमच्या पत्नीबद्दल जर तुम्हाला असं कोणी म्हणाला की, 'तुमच्या पत्नीत बाकी सगळे गुण आहेत, पण त्या चंचल आहेत.' तर तुम्ही पायातला जोडाच काढाल की नाही! तर नारायण नाही का काढणार?
       
जिथे आपल्यासारखा शरीरात धमक नसलेला माणूस हे ऐकून गरम होतो तिथे नारायण नाही का गरम होणार! बस, जो उठला तो लागला लक्ष्मीला शिव्या घालायला. कारण काय तर आम्ही आध्यात्मिक झालोय ना! जरा डोईवरचे पिकले, जरा घरदार बुडालं, जरा नोकरी व्यवसायात उतरती कळा लागली, जरा सट्यात हवा तो आकडा लागला नाही की, हे सांगायचं की, धनसंपत्ती खोटी आहे! मग काय सुरू झालाच म्हणून समजा, 'लक्ष्मी चंचल आहे.' मग देव पण म्हणत असेल, हे रस्त्यावरचे मवाली माझ्या पत्नीला शिव्या घालतात! यांच्यात ताकद नाही लक्ष्मी सांभाळण्याची आणि लक्ष्मीला चंचल म्हणतात. 

अप्रतिम विचार! ही पारंपरिक समजुतींना धक्का देणारी आणि विचार करायला लावणारी मांडणी आहे. आपण सहजगत्या "लक्ष्मी चंचल आहे" असं म्हणतो, पण हे लक्ष्मीचं नव्हे, तर माणसाच्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे.

अनेकदा, धन मिळवण्याआधी माणूस श्रद्धाळू आणि नम्र असतो, पण एकदा संपत्ती मिळाल्यावर त्याची वृत्ती बदलते. खरे पाहता, दोष धनाचा नाही, तर त्या धनाला सांभाळण्याच्या आपल्या क्षमतेचा आणि मानसिकतेचा आहे. भगवंताच्या पत्नीला आपण चंचल म्हणतो, हेच मुळात चुकीचं आहे. लक्ष्मी ही नारायणाची आहे, ती संतुलन ठेवल्यास टिकते, अन्यथा निघून जाते.

या दृष्टिकोनातून विचार केल्यास, आपल्याला धनाचा तिरस्कार करण्याची नव्हे, तर त्याचा योग्य वापर करण्याची शिकवण घ्यायला हवी. हीच खरी आध्यात्मिक समज आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन