Umbrella of Spirituality | अध्यात्माची छत्री
रघुवंशी राजांच्या कुळातून आठ - आठ पिढ्यापर्यंत लक्ष्मी गेली नाही असं वर्णन आहे. त्यांच्या जवळची लक्ष्मी जाईलच कशी? जाणेच शक्य नाही.
भले विश्वातले सगळे भोगेश्वर आहेत, पण आमचे पूर्वज भोगांना घाबरले नाहीत. त्यांनी ते ते भोग आपल्या खिशात ठेवले. त्या भोगांमध्ये अडकून भोगलंपट न होता, भोगांना ना भक्तीकडे घेऊन जाऊन पुढे आत्मज्ञानाचा मार्ग अनुसरणारे जे लोक आहेत त्यांनाच खरोखर हे भोग पचले आहेत असं म्हणायला हवं. त्यांनीच खरोखर पैसा पचवला आहे. या वैश्विक भोगामधल्या नश्वरतेची भीती काढून टाकून माणसाने पुढे जायला हवं. भोग समोर आल्यावरही माणूस चलित होणार नाही, हे फार कठीण आहे.
जोपर्यंत पैसा मिळालेला नाही तोपर्यंत हे बोलता येतं. पैसा मिळायला लागला, अरे, चारही बाजूंनी पैशांचा वर्षाव व्हायला लागला की माणसाचं डोकं ठिकाणावर राहतच नाही! मग चांगल्या कार्यासाठी सुद्धा तो म्हणतो no time हे असं होणारच हे समजून चला! देवाचं काम करण्याची वेळ आली रे आली की हा माणूस त्यातून आपलं अंग काढून घेणार. कारण की चारही बाजूने त्याच्यावर पैशांची बरसात होते आहे. पावसात उभा राहिला की माणसाला सर्दी होणारच.
पाऊस उपयोगी आहेच, पण आपल्याला त्याचा त्रास होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. पाऊस पडलाच पाहिजे. कारण की त्याने धान्य पिकणार आहे, प्यायला पाणी मिळणार आहे, विहिरीत पाणी येणार आहे. मात्र आपण त्याने भिजून जाऊ नये यासाठी छत्री घेऊन फिरलं पाहिजे. म्हणजे पाऊस पण मागायचा आणि छत्रीने स्वतःचे रक्षण सुद्धा करायचे. तशाच प्रकारे माणसाने पैसा मागितला पाहिजे. कारण पैशामुळेच सर्व व्यवहार चालत असतात. पैशाला शिव्या देणारे लोकही पैशासाठीच शिव्या देत असतात. ज्याच्या खिशात कवडी सुद्धा नसते आणि दमडी देखील कमावण्याची धमक नसते ते लोक, ज्यांच्याजवळ पैसा आहे अशा लोकांना समतेची भाषा शिकवीत असतात. कारण काय तर तुमच्या खिशातले माझ्या खिशात यायला हवेत! आणि ते सुद्धा कालमानानुसार व हक्काने यायला हवेत. यासाठी चाललेला हा त्यांचा अट्टाहास आहे. अशा प्रकारे त्याच्या पाठीमागे एक मोठे तत्त्वज्ञान उभे करण्यात आलेले आहे. तर सांगायचं असं की, देवा! तू पैशांचा पाऊस पाड पण त्याचबरोबर मी अध्यात्माची छत्री घेऊन फिरेन; नाहीतर मला बाधा होण्याची शक्यता आहे.
खूपच समृद्ध आणि विचारप्रवर्तक मांडणी आहे! भोग आणि अध्यात्म यांच्यातील संतुलन, पैशाच्या मोहात न अडकता त्याचा योग्य उपयोग करण्याची वृत्ती, आणि धंजीवनातील तत्त्वज्ञानाचा गहन विचार—हे सर्व या लेखातून अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले आहे.
रघुवंशी राजांच्या संदर्भात दिलेला दृष्टांत हे स्पष्ट करतो की भोगांना घाबरण्याऐवजी त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून आत्मज्ञानाकडे जाणे हेच खरे कौशल्य आहे. "पैशाचा पाऊस आणि अध्यात्माची छत्री" हा दृष्टांत तर फार प्रभावी आहे—समृद्धी हवीच, पण तिच्या आहारी न जाता विवेकाने तिचा उपयोग करणे आवश्यक आहे.
या विचारप्रवाहात आणखी काही मुद्दे गुंफता येतील—उदाहरणार्थ, अर्जुनाने श्रीकृष्णाकडून घेतलेला गीतेचा उपदेश. त्यालाही युद्ध करायचे होते, भोगही त्याच्या वाट्याला येणार होते, पण तरीही त्याने कर्मयोग आणि भक्तीमार्ग यांचा स्वीकार केला. हाच तो "भोगांना भक्तीकडे नेण्याचा मार्ग!"
Comments
Post a Comment