क्लेश- अभिनिवेश ( आग्रह)
क्लेश- अभिनिवेश अभिनिवेश हा देखील क्लेशच आहे. अभिनवेश म्हणजे आग्रह. हे झालेच 'पाहिजे' असा ज्याचा आग्रह ओसरला असेल त्याचा भगवान सखा होतो. त्याच्याशी भगवंत संबंध बांधतो. म्हणजेच 'ठेविले आनंते तैसेची रहावे' ही वृत्ती जीवनात आणली पाहिजे. काही गोष्टी आपल्याला सोडता आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जे स्वीकारण्यायोग्य असेल ते स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. ज्याच्या जीवनातून हे पाच क्लेश जातात त्याच्यासोबत भगवान संबंध बांधतो. विज्ञान ज्ञानाने समज निर्माण होते आणि विज्ञानाने अनुभूती येते, त्यामुळे तृप्ती येते. येथे पदार्थ विज्ञानाला उद्देशून विज्ञान शब्द वापरलेला नाही. प्रयोग शाळेत अनुभवाला येथे ते विज्ञान नाही त्या विज्ञानाचे प्रयोग दुसऱ्याच्या शरीरावर होऊ शकतात, माकडांवर, उंदरांवर वैज्ञानिक लोक प्रयोग करतात. परंतु अध्यात्मातले प्रयोग स्वतःच्या शरीरावरच होतात. दुसऱ्याच्या शरीरावर अहं ब्रह्मास्मि चा प्रयोग होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे जाणीव, समज व विज्ञान म्हणजे प्रयोगाद्वारे स्वतःच्या जीवनात त्याचे अनुभूती घेणे. या दोहोंमुळे ज्याचा आत्मा तृप्त झाला आहे, ज्याला हा तृप्तीचा ...