स्वतःच्या पायावर स्वतः उभं असणं गरजेचं.


उद्धरेदात्मनात्मानम् हा गीतेचा सत्य सिद्धांत आहे. Self- Made होण्यात - स्वतःच्या पायावर उभा राहण्यात जो आनंद आहे तो कोणाच्या आधाराने उभा राहत नाही. स्वतः सोडवलेले गणित बरोबर ठरले तर त्याचा जो आनंद होतो तो कोणी दुसऱ्याने सोडवलेले गणित कॉपी करण्यात नाही. कॉपी करणाऱ्याला माहीत नसते की या गणितात एके ठिकाणी समजा तीन आणि दुसऱ्या ठिकाणी सतरा कशासाठी लिहिलेत! अशाच प्रकारे भगवद्भक्त, योगारूढ, स्थितप्रज्ञ किंवा त्रिगुणातीत यांची जी एक विशिष्ट स्थिती आहे, त्याची कोणी 'कॉपी' केली तर त्यात काही अर्थ नाही. हे सर्व सिंह आहेत आणि जगनमाता सिंहीण आहे. सिंहाचा छवा असण्याची पात्रता असलेली व्यक्तीच अशा आईपाशी पोहोचू शकेल! बकरा तिथे पोहोचूच शकणार नाही.

 ईश्वर भक्ती केल्याशिवाय आणि ईश्वराचे तादात्म संबंधाशिवाय कोणीही माणूस वर जाऊ शकत नाही. म्हणजेच त्याची उन्नती शक्य नाही. एवढ्या भूमिकेवर पोहोचल्यावरही माणसाने, गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे.

ईश्वरभक्ती आणि गुरुचे मार्गदर्शन या दोहोंचीही आवश्यकता आहे, पण चालायचे आहे ते माणसाने स्वतःच! तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जायला ना गुरु येणार की ना भगवंता येणार.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन