क्लेश- अस्मिता (अहंकार)

 क्लेश- अस्मिता (अहंकार)

जशी अविद्याही क्लेश आहे तशी अस्मिता देखील क्लेश आहे. अस्मिता म्हणजे अहंकार. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवान बंधू होऊ शकत नाही. हा अहंकार कोणालाही सोडवत नाही. सगळेच कीर्तनकार रावण, हिरण्यकश्यपू, कीचक या सगळ्यांचे वर्णन करताना सांगतात की, ते सगळे अहंकारी होते म्हणून त्यांचा नाश झाला. मात्र हे कीर्तनकार स्वतः आपला अहंकार सोडू शकत नाहीत. त्यांचे कीर्तन पूर्ण होताच लगबगिनी शेठजींना विचारतात, 'काय शेठजी आजचे कीर्तन कसे काय वाटले? शेठजी जेव्हा म्हणतात, महाराज आजच्या कीर्तनाचे काय वर्णन करायचे! आज तर जणू साक्षात नारद स्वर्गातून उतरून आले होते असे वाटत होते' तेव्हा कीर्तनकार खुष! अशाप्रकारे, वस्तूत: माणूस अहंकारावरच जगत असतो.

माणसाला अहंकाराचा मोह आहे. त्याचा अंकार सुटत नाही म्हणून स्वतःचा अहंकार भले बाळगू दे पण त्या अहंकाराला देवाबरोबर जोडायचे आणि 'मी तुझा आहे' असा अहंकार बाळगायचा. 'मी तुझा आहे' हा अहंकार आहे, पण तो अहंकार निर्लेप आहे. जोपर्यंत अस्मिता आहे, स्वतःचा अहंकार आहे तोपर्यंत भगवान् बांधत नाही.
राग-व्देष हे देखील क्लेश आहेत. राग- व्देष म्हणजे आसक्ती. जीव आसक्तीपूर्ण आहे. म्हणून भगवंत त्याच्याशी संबंध बांधत नाही.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन