क्लेश - माझा कोण आणि शेवटी माझ्यासोबत येणार काय ?
क्लेश - अविद्या
अविद्या म्हणजे विरुद्ध समज. योगदर्शन फारच बुद्धिपूर्ण ग्रंथ आहे. त्यात अविद्येची व्याख्या करताना योगदर्शनकार सांगतात. अनित्याला नित्य समजणे, अशुचितेला शूचि समजणे. अनित्याला नित्य समजणे ही अविद्या आहे. आपला जीवनव्यहार तपासला तर जाणवेल की आपले निर्णय टूसतत बदलत राहतात, कोणताही एक निर्णय कायम राहत नाही. अहो आपण आपले संबंध देखील पक्के धरून ठेवू शकत नाही, जीवनात माझा कोण? आणि माझे काय? हे निश्चित नाही. माझे कोण आणि माझे काय? हे ज्याचे पक्के होते तो पुढे जाऊ शकतो. माझे काय? तर ते तर जे माझ्यासमोर येते ते. माझ्यासोबत केवळ माझे कर्म येते. त्यामुळे कर्म माझे.
त्याचप्रमाणे माझा कोण? तर फक्त प्रारब्ध माझा. दुनियातील सगळे सबंध गरज आणि परिस्थितीनुसार बदलतात. आपले सगळे सबंध स्वार्थाचे आहेत. स्वार्थ पूर्ण होताच सबंध सुटतो. पण सबंध प्रभूसोबत चा संबंध से मुअसा आहे की कधीही बदलत नाही आपण वाटल तसे वर्तन केले तरी प्रभू आपल्याला कधीच सोडत नाही. त्याचा सबंध निरंतर आहे. आणि दुसरे सगळे सबंध अनित्य आहेत. प्रभूसोबतच्या अशा नित्य संबंधाला महत्व न देता जे अनित्य सबंध आहेत त्यांनाच आपण जीवनात प्राधान्य देतो. अरे! आपण देवाला विकून दुनिया विकत घेऊ पाहतो म्हणून आपण अविद्याग्रस्त आहे आणि म्हणूनच आपल्याला ऋषी आपलेसे वाटत नाही. जे भगवंताचे लाडके आहेत ते देखील आपल्याला आपलेसे वाटत नाही. आपण तर आपल्याशी गोड गोड बोलतात, सुख साधने देतात, प्रलोभने दाखवतात तेच आपलेसे वाटतात. अशा अविद्याग्रस्त लोकांचा भगवंत बांधव होऊ शकत नाही.
भगवंताचे बांधव व्हायचे असेल तर 'माझा कोण' हे नक्की करता आले पाहिजे. भगवान माझा; भगवतशक्तीला मानून तदनुरूप लिहिणारे ऋषी माझे, तदनुरूप जगणारे संत माझे. त्यांच्याशीच आत्मीय संबंध बांधायचा. त्याशिवाय इतरांना मला किंमत द्यायची नाही. तर मग काय इतरांसोबत सबंध नाही बांधायचा? सबंध बांधायचा पण केवळ व्यवहारापुरता. त्यांच्याशी आत्मीय संबंध नाही बांधायचा.
Comments
Post a Comment