अनन्यता - या जगात फक्त भगवंत माझा आणि मी भगवंताचा.
अनन्यता
' या जगतात माझे दुसरे कोणीच नाही. भगवान्! तूच माझी गती आहेस. तूच माझा खरा बंधू आहेस. प्रभू शिवाय आपला या जगतात दुसरा कोणी बांधव नाही.' ही भावना ज्याची दृढ होते त्याला भगवान् उचलतो, तोच अनन्याश्चिन्तयन्तो माम् झाला असे म्हटले जाते.
जोपर्यंत भगवान आहे आणि दुसरा पण आहे अशी समज डोक्यात खेळते आहे तोपर्यंत भगवान देखील विचार करतो की दुसरा मदत करतो आहे तर करू दे! म्हणून केवळ भगवानच आणि दुसरा कोणी नाही'. ही भावना दृढ होणे जरुरी आहे.
Comments
Post a Comment