भगवंता आणि आपल्यात बंधुत्व आणायचा असेल तर दृष्टी बदलली पाहिजे.

 भगवान् बांधव म्हणून आपल्याकडे पाहत असेल तर आपले मन, आपले जीवन असे असले पाहिजे की आपल्यासोबत बंधुत्व करायला भगवंताचे मनही तयार झाले पाहिजे. भगवान आपला रंग किंवा वय पाहत नाही, शिक्षण देखील पाहत नाही. इतकेच नाहीतर भगवान् आपल्याकडे किती पैसे आहेत हे देखील पाहत नाही. तर भगवान आपली जीवनपरंपरा अमुक एक प्रकारचे आहे किंवा नाही ते पाहतो.

भगवंताने आपला बंधू हवे म्हणून प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचे? त्याकरता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कपडे बदलले किंवा भगवी वस्त्रे परिधान केली तरी दृष्टिकोन बदलत नाही. दोन पैशाचा गेरू घेऊन कपडे भगवे करता येतातही, त्यामुळे लोक कदाचित नमस्कार ही करतील परंतु भगवान मान्यता देणार नाही. 

भगवंताला बांधव बनवायचे असेल तर भगवंताला आवडेल अशी जीवन परंपरा, जीवन संहिता असायला हवी. योगदर्शनकारांनी याचा फार सुंदर उपाय दाखवताना म्हटले आहे. अविद्यास्मिता रागद्वेषाभिनवेश: पंञ्च क्लेशा:| हे क्लेश कमी केल्यानंतरच चित्तवृत्तीनिरोध: होऊ शकतो माणसात जोपर्यंत अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनवेश हे पाच क्लेश आहेत तोपर्यंत भगवान माणसाचा बंधू होत नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन