आत्मशक्ती : जीवनाचा होता

मानवी जीवनाचं उन्नतीकरण आणि उदात्तीकरण हे बाह्य साधनांमुळे नव्हे, तर अंतरातल्या शक्तीमुळे घडतं. जसं सामान्य जीवन चित्तशक्तीवर चालतं, तसंच संपूर्ण जीवन आत्मशक्तीच्या हवनावर आधारलेलं आहे. आत्मशक्ती हा होता आहे—आणि जीवन हा अखंड चाललेला यज्ञ आहे.

माणसाने हा एक विचार जर बुद्धीमध्ये दृढ केला, मनाने स्वीकारला आणि अंतःकरणपूर्वक मान्य केला, तर त्याच्या संपूर्ण जीवनाची दिशाच बदलून जाईल. आज अनंत समस्या उभ्या आहेत—वैयक्तिक, सामाजिक, नैतिक. या सर्वांचा मूळ कारण एकच आहे :
माणूस आत्मशक्तीला होता मान्य करत नाही.

आज आपण जीवन वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलं आहे. मानसशास्त्र वेगळं, अर्थशास्त्र वेगळं, नीतीशास्त्र वेगळं, राज्यशास्त्र वेगळं—आणि अध्यात्म यांच्याशी काहीही संबंध नाही, असा गैरसमज आपण करून घेतला आहे. अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्र यांचा काही संबंध नाही, असं मानून आपण समस्या निर्माण केल्या; आणि त्या सोडवण्यासाठी पुन्हा बाह्य उपाय शोधत राहिलो.

परंतु जीवनाचं सत्य असं आहे की—
आत्मशक्तीच होता बनून अखंड हवन करत आहे, म्हणूनच जीवन चालत आहे, विकसित होत आहे.
हा एक सिद्धांत जर माणसाने मनःपूर्वक स्वीकारला, तर जीवनातील अनेक गुंतागुंती सहज सुटू शकतात. कारण तेव्हा जीवनाचा पाया अध्यात्मप्रधान होईल.

अध्यात्मप्रधान संस्कृती म्हणजे केवळ मंदिरांची उभारणी, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत दर्शन करणं एवढंच नव्हे.
खरा प्रश्न हा आहे की—
माझं जीवन कोणत्या मूलभूत सिद्धांतावर उभं आहे?

उपनिषदांमध्ये असे अनेक मूलतत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारावर संपूर्ण मानवी जीवन उभं राहू शकतं. एकेकाळी ते उभं होतं, आणि उद्याही ते उभं राहू शकतं. मात्र आज माणूस संध्यात्मक मनःस्थितीत अडकलेला आहे—
ना पूर्णपणे भौतिक, ना पूर्णपणे आध्यात्मिक.

जोपर्यंत आत्मशक्तीला जीवनाचा होता मानलं जात नाही, तोपर्यंत जीवनाचा यज्ञ विस्कळीतच राहील.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन