विकार सज्जन आसतात

कुणीतरी सांगितलं म्हणून जरी तुम्ही हातात माळ घेतलेली असेल, समज नसताना सुद्धा माळ घेतलेली असेल; तरी पण विकार समजूतदार असल्याने आपोआपच ते निघून जातील. समोरचा माणूस जर हुशार असेल तर आपल्याला अक्कल कमी असली तरी एक वेळ चालते. आपल्या बोलण्याचा तो योग्य तोच अर्थ घेणार.

एकदा कालिदास तीर्थयात्रा करायला गेला होता. आणि ती संधी साधून प्रतिष्ठानपुरचा एक पंडित भोजराजाच्या दरबारात येऊन उभा राहिला. त्याकाळी लोक रिटर्न तिकीट काढून तीर्थयात्रा करत नसत. तीर्थयात्रा म्हटली म्हणजे आठ -दहा महिने सहज निघून जायचे. तो पंडित भोजराजाच्या दरबारात प्रतिष्ठानपूरहून आला तोच मुळात वाद विवाद करण्याची इच्छा बाळगून. त्याला बाकी कोणीच हरवू शकत नव्हता.

मधल्या एका काळामध्ये निरनिराळ्या संप्रदायाचे लोक पंडितांना आपल्या पदरी बाळगत असत. त्या अशासाठी की, त्यांच्या विचारांचे कोणी खंडन करू नये. कोणी म्हणत, 'आम्ही केवलाव्दैती आहोत.' कोणी म्हणत, 'आम्ही विशिष्टाव्दैती आहोत.' कोणी म्हणत, 'आम्ही शुद्धाद्विती आहोत.' असे निरनिराळे पंडित वादविवाद करण्यासाठीच खास राखण्यात येत असत. याचं कारण त्याकाळी वादविवादाला महत्त्व होतं, ज्ञानाला नाही.

अशा प्रकारे भोज राजाच्या दरबारातल्या पंडितांना हरवून मानपत्र मिळवू या उद्देशाने तो प्रतिष्ठानपुरचा पंडित येथे आला होता. त्याने चर्चा विवादामध्ये बाकी सर्वांना हरवलंही आणि भोज राजाला म्हणाला, 'मी तुमच्याकडल्या सर्व पंडितांना पराजित केल आहे. तुमचे पंडित काही मला हरवू शकले नाहीत. तेव्हा मला ताम्रपट लिहून द्या.'

भोजराजाने विचार केला, 'कालिदास इथे नाही. आता करायचं काय? या पंडिताला हरवलं पाहिजे. नाहीतर माझ्या दरबाराचा आजवरचा नावलौकिक जाईल.'

भोज राजा त्या पंडिताला म्हणाला, 'तुम्ही आला आहात तर एक दोन दिवस इथेच थांबा. तुम्हाला कोणी हरवू शकला नाही तर मी तुमची इच्छा पूर्ण करीन.'

सायंकाळी भोजराजा विमानतळ स्थितीमध्ये क्षिप्रा नदीच्या किनारी यरझारा घालत होता. आणि त्याचवेळी गंगू तेली फिरण्यासाठी तिथे आला. त्याने राजाला चिंताग्रस्त स्थितीत पाहिलं. त्याने विचार केला, 'चला, जाऊन नमस्कार तर करून येऊ. पण महाराज आज अस्वस्थ दिसत आहेत. आणि जर आपण त्यांची ही समस्या सोडवू शकलो तर आपलाही बेडा पार !'असा विचार करतो. भोजराजाच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, 'राजासाहेब, आज अस्वस्थ कशाने आहात?'
राजाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, 'अरे! तू कोण आहेस?'
तो म्हणाला, 'मी गंगू तेली. पण तुम्ही अशा कोणत्या चिंतेत पडला आहात?'
राजाच्या मनात विचार आला, 'याला माझी समस्या सांगून काय कळणार आहे?'
तरी देखील गंगू तेली म्हणाला, 'राजा साहेब, तुम्ही सांगा तर खरं!'
राजा म्हणाला, 'आपल्या दरबारात एक पंडित आलेला आहे. आणि कवी कालिदासांच्या गैरहजेरीमुळे तो आपल्या दरबाराचा सगळा नावलौकिक पुसून टाकेल की काय या भीतीने मी फार दुःखी झालो आहे. मी राजा आहे म्हटल्यावर मला या सगळ्यांचा सांभाळ केलाच पाहिजे. तो पंडित येथे विजयी झाला तर त्याला दिग्विजय प्राप्त झाला असं ठरेल आणि त्याच्या मनात अस विचारांचा प्रवेश होईल की भारतात मला पराभूत करणारा कोणीही नाही. त्यामुळे त्याचा अहंकार वाढला तर त्याचं आध्यात्मिक पतन होईल. आता कालिदास परत यायला आणखी एक वर्ष तरी लागेल आणि त्याचा पराभव करेल असा दरबारात दुसरा कोणी पंडित दिसत नाही. तेव्हा करावं काय ते सुचत नाहीये.'

गंगू तेल्याने विचार केला, 'राजा सध्या अडचणीत आहे. मी जर त्याच्या उपयोगी पडलो तर फायदा माझाही आहे.' त्याने राजाला म्हटलं, 'राजेसाहेब! हे पंडित लोक स्वतःला समजतात तरी काय? त्यांनी चार पुस्तकं वाचली म्हणून काय ते शहाणे झालेत होय? आणि आमच्यासारख्यांना काय कमी अक्कल आहे की काय? आम्ही काय अक्कली शिवाय इतका धंदा उभा केलाय?'

व्यापाऱ्यांना नेहमीच आपल्या अकलेची मिजास असते. त्यांना भले इंग्रजी भाषा येत नसेल, पण त्यांची मिजास काय, तर म्हणे, 'सात पंडितांना आम्ही आमच्या सेवेला ठेवला आहे.' नितीशास्त्र सांगतो:
ते सर्व धनवृद्धानां द्वारि तिष्ठन्ति किॾकरा:|

भगवंता! तू आम्हाला झुरळाचा जरी जन्म दिला तरी चालेल, पण अशा गुलामगिरीचे दिवस कधी दाखवू नकोस. वेदवत्ता असेल, कर्तुत्व असेल, तेजस्विता असेल अशा माणसाला जिथे त्याची कदर होत नाही अशा ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला तर तो मृत्यू समानच वाटतो. त्याच्या ऐवजी दुसरा कोणतही जीवन स्वीकारण्यास तो तयार होईल!

गंगू तेल्याने विचार केला, 'माझ्याकडे काय अक्कल नाही? त्याच्याशिवाय काय मी एवढे दोन दोन वाडे बांधले? हे पंडित समजतात काय स्वतःला? तो राजाला म्हणाला, 'महाराज! मी त्या पंडिताला हमखास हरवतो की नाही बघा! तुम्ही बिलकुल काळजी करू नका!'

राजा म्हणाला, 'अरे तुझ्या आवाक्यातलं नाहीते. साध पहिली इयत्तेत सुद्धा तू बसला नसेल. आणि तो त्या पंडिताला काय उत्तर देणार आहेस? तुला तेवढी अक्कल तरी आहे काय?'

त्यावर गंगूतेली उद्गारला, 'महाराज! तुम्ही मला कमी लेखू नका. सूर्य केवढा मोठा आहे, केवढा महान आहे! पृथ्वीपेक्षा चोदा लाख पट मोठा आहे सूर्य. असं मी ऐकलं आहे. पण त्याच्या तापापासून आपल्याला बचाव करायचा असेल तर अडीच रुपयाची छत्री देखील उपयोगी पडते. सूर्याशी भांडून त्याला जिंकता येत नाही. त्याच्यासाठी युक्ती लढवावी लागते. त्याप्रमाणे माझं शिक्षण कदाचित कमी असेल पण मी युक्तीने त्या पंडिताला हरविन.'

गंगू तेल्याने विचार केला की, 'यानिमित्ताने आपल्याला राज दरबारात तरी जायला मिळेल! आपण जिंकलो तर मान मरातब मिळेल आणि नाही जिंकलो तर गंगू तेलीच राहणार आहोत.' म्हणून त्याने राजाला छाती ठोकून सांगितलं, 'तुम्ही मला एकदा प्रयत्न तरी करू द्या!'

राजाने विचार केला, 'तसा देखील दरबारचा नावलौकिक जाणारच आहे. पाहूया तरी हा गंगू तेली काय करतो ते!' म्हणून राजा म्हणाला, 'चल, कबूल आहे! तू उद्या सकाळी तयार रहा. मी आज तुझ्यासाठी वस्त्र प्रावरणे पाठवतो आणि उद्या सकाळी तुला घेण्यासाठी पालखी पाठवतो.' गंगू तेली यावर खुश झाला.

इकडे राजाने धारानगरीत अशी बातमी प्रस्तुत केली की, 'कालिदासाचे गुरु जे आज पर्यंत अज्ञातवासात होते ते आलेले आहेत. पंचवीस वर्षे त्यांनी तपश्चर्य केली आहे; मात्र धारानगरीचा लौकिक जाऊ नये यासाठी त्यांनी आज इथे खास आगमन केल आहे आणि प्रतिष्ठान पुरच्या पंडिताशी ते वाद-विवाद करणार आहेत.'

नगरात ही वार्ता सर्वत्र पसरली आणि तो प्रतिष्ठान पुरचा पंडित मात्र घाबरला. त्याला वाटलं, 'आपण संधी पाहून इथे आलो होतो खरे, पण आता हा कालिदासाचा गुरु मध्येच कुठून येऊन टपकला!' दरबारातल्या पंडितांच्याही मनात विचार आला, कालिदासाच्या गुरुबद्दल आपण कधी ऐकलेलं नाही आणि त्यांना पाहिलेलं देखील नाही! संपूर्ण नगरात ही बातमी पसरलेली असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सर्वांनी दरबारात जाण्याचा निश्चय केला.

राजाने प्रति पक्षातल्या त्या पंडिताच मानसिक बळ खलास करण्यासाठी छान उपाय केला आणि तो बरोबर सफल झाला. प्रतिष्ठान पुरचा पंडित मनातून चांगलाच घाबरलेला होता, की आता पुढे होणार तरी काय? हनुमंताने जेव्हा लंका जाळली त्यावेळी ती मरकटलेला नक्कीच नव्हती. लंकेतल्या प्रजेला वाटू लागलं की, 'एक माकड येतो काय आणि अख्खी लंका जाळून भस्मसात करतो काय. तर मग त्या रामापाशी अशी लाखो वानरांची सेना आहे. तेव्हा आपला होणार तरी काय? अशा प्रकारे रावणाच्या सैन्याचं नैतिक मनोबल खलास झालं आणि हनुमंताने अर्धी लढाई तिथेच जिंकली. मनाने मेलेला माणूस लढाई करू शकत नाही. या पंडिताची अशी स्थिती झाली.

ही शरीराने उंच आणि गोरा गोमटा होता. फक्त वरून त्याचा एक डोळा तिरळा होता. पण दिसायला मात्र चांगला होता. त्यात आणि राजाने पाठवलेले चांगल्यातली चांगली उंची वस्त्रे परिधान केल्यावर ते काय विचारता! दंभ करायचाच असेल तर तो पूर्णच केला पाहिजे ना! दंभ असा करावा की ब्रह्मदेवानेही त्याची नोंद घेतली पाहिजे!

असा हा गंगू तेली सर्व साज परिधान करून, पालखीत बसून दरबारात आला. दरबारात तेव्हा पाय ठेवायला जागा शिल्लक राहिली नव्हती. कालिदासांचे गुरु आले आहेत म्हटल्याबरोबर सगळेच त्यांना नमस्कार करायला लागले. सगळ्यांचे नमस्कार स्वीकारत स्वीकारत पुढे येत होता. गंगू तेल्याने कधी दरबार बघितलेलाच नव्हता. त्यामुळे त्याला घामच फुटला. त्याची किंमत ही राजानेच वाढवलेली होती त्यामुळे राजालाच त्याला सांभाळून घेणे गरजेचे होतं. कारण राजाला आपल्या दरबाराचा नावलौकिक राखायचा होता. तेव्हा राजा म्हणाला, 'गुरु महाराज सतत रानावनात आणि गिरी कंदरात राहणारे, त्यामुळे त्यांना नगर परिसरातली उष्णता सहन कशी होणार? म्हणून त्यांना इतका घाम फुटतो आहे!' तेव्हा जरा गंगू तेली निर्धास्तपणे दरबारात पुढे गेला.

दंभ करायचा तर तो इतका बेमालूम असला पाहिजे की कोणालाही त्याचा थांगपत्ता लागता कामा नये! भारत चंपू या काव्यामध्ये अर्जुनाच्या दंभाचं वर्णन केलेल आहे. ज्यांनी संस्कृत भाषा कधी वाचली नाही त्यांचं जीवन व्यर्थ आहे. वृथा गतं तस्य नरस्य जीवितम्| संस्कृत भाषेत तेजस्वीता आहे, भाव आहे, काव्य आहे, शृंगार आहे, सर्व काही आहे. अर्जुनाला सुभद्रेसोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्रिदंडी संन्यास घ्यायला लावला आणि अर्जुनाने तो घेतला. देखील त्या महात्म्याला बळरामाने आपल्याकडे आणलं आणि त्यांच्या सेवेसाठी सुभद्रेची योजना केली. सुभद्रा अतिशय सुंदर होती.अर्जुनाला सुभद्राबद्दल आकर्षण होतच. म्हणूनच तिला पाहून अर्जुनाचे रोमांच उभे राहायचे. अर्थात त्यामुळे अर्जुन खजिलही व्हायचा. पण सांगणार कोणाला? शेवटी संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः आला आणि विचारलं, 'कसे आहात संन्याशी महाराज! तुमचं चाललंय ना बरोबर सगळं?'

अर्जुन म्हणाला, 'चाललय बरोबर; पण सुभद्रेला पाहिलं की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. माझी अशी बिकट अवस्था होते की, काय सांगू आणि पुढ्यात दुसरे सगळे लोक बसलेले असतात त्यांना काय वाटत असेल? तेव्हा तुम्ही काहीही करून मला इथून बाहेर काढा!'

श्रीकृष्ण म्हणाला, 'अरे वेड्या! तुला साधा दंभही करता येत नाही. जेव्हा रोमांच उभे राहतात तेव्हा 'नारायण, नारायण' म्हणून डोळे मिटून घे, म्हणजे लोकांना असं वाटेल की भक्तीच्या योगेच हे रोमांच उभे राहिले आहेत!' भगवान श्रीकृष्णाच्या बुद्धिमत्तेचा पार कोणालाही लागू शकणार नाही. त्यांच्या डोक्यामध्ये अर्थाचे शस्त्र तयारच असतात!

तर इकडे गंगू तेली कालीदासाच्या गुरुचं सॉंग घेऊन सजवून आला खरा, पण इतका सगळा जनसमाज बघून आतून घाबरून गेला. एखाद्या सभेत दोन शब्द बोलायचे तर कोणत्याही माणसाची 'त-त', 'प-प' होते. सभेत बोलणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही!
शतेषु जायेते शूर: सहस्रेषु च पण्डित:|
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा||
शंभरात एखादाच माणूस शूर असतो, दहा हजारात एखाद्या माणूस वक्ता आसतो. थोडफार बोलता आलं म्हणजे वक्ता झालं असं नव्हे. शेठजी आपल्या सेक्रेटरी कडून भाषण लिहून घेतात. पंधरा दिवस ते बोलण्याची प्रॅक्टिस करतात. पण चार ओळीच ते भाषण करण्याचा प्रसंग आला तर सभेत उभे राहताच शेठजीच पाय थरू थरू लागतात. तोंडातून शब्द फुटत नाही. पण अशावेळी सेक्रेटरी हुशार असेल तर तो शेठजीची अवस्था पाहिल्यावर लगेच उभा राहतो आणि म्हणतो, 'तुम्हा सर्वांच प्रेम पाहून शेठजीच्या अंतकरणातून इतके उमाळे फुटत आहेत की, तुमच्या समोर त्यांना आता बोलावतही नाही. म्हणून त्यांच्या वतीने मी भाषण वाचतो.' सेक्रेटरी हुशार असला पाहिजे. ज्याचा सेक्रेटरी चांगला हजर जबाबी असेल त्याला अक्कल कमी असले तरी चालून जाते. अशा प्रकारे गुरूला अक्कल थोडी असली तरी चालेल, पण शिष्य शहाणा असला पाहिजे. ज्याचा शिष्य शहाणा तो गुरु तरुन जातो! अर्थात त्यातला विनोद सोडून द्या. हा काही सत्य सिद्धांत तुम्ही सांगत नाही. नाहीतर एखादा समजायचा की, गुरु हलकाच असतो आणि शिष्य शहाणाच असतो.

भोजराजाने बाजू सावरून घेतली तेव्हा कालिदासाचे गुरु आपल्या आसनावर जाऊन बसले. गंगूतेली शरीराने चांगला दणकट होता. त्याने आज वस्त्र पण चांगल्यातली परिधान केलेली होती. त्यामुळे त्याचा प्रभाव तर छानच पडला होता. त्यातून हे कालिदासाचे गुरु आहेत असं समजल्यावर प्रतिष्ठान पुरच्या पंडितांची गाळण उडाली होती. सभा जशी शांत बसली तशी भोजराजाने पंडितराजांना वादविवाद सुरुवात करण्याची सूचना केली. त्या पंडीतांनी कालिदासाच्या गुरूला एक बोट दाखवलं. ते पाहून गंगू तेल्याने त्याला दोन बोट दाखवली. पंडीतांनी हात उंच करून आपला पंजा दाखवला. त्याबरोबर गंगू तेल्याने त्याला मूठ दाखवली. एवढ्यानेच काय झालं कोणास ठाऊक! हे पंडितराज उभे राहिले आणि कालिदासाच्या गुरूंचे त्याने पायल धरले आणि म्हणाला, 'खरोखर! तुम्ही महान पंडितराज आहात. तुमच्या विद्वत्तेसमोर मी तुच्छ आहे! तुम्ही जिंकलात आणि मी हरलो.'

हे सगळं पाहिल्यावर सभेतले लोक विचारात पडले की, 'चर्चा नक्की झाली तरी काय? आणि कालिदासाचे गुरु जिंकले म्हणजे तरी काय?' त्यांना काहीच कळलं नव्हतं. राजाला हे मात्र माहीत होतं की, कालिदासाचा गुरु खरा कोण आहे!

राजा दरबाराच्या मागच्या बाजूला गेला आणि त्याने त्या पंडिताला बोलावून घेतलं. राजांनी त्याला विचारलं, 'पंडितराज! तुमची प्रश्न उत्तरी झाली खरी, परंतु तुमच्यासारख्या विद्वानांच्या प्रश्नोत्तरीत आम्हाला काही समजलच नाही. तुम्ही हार कबूल केली खरी; पण तुमचे सवाल जवाब आमच्या काही ध्यानी आले नाहीत. तेव्हा ते समजावले तर कळेल.'

पंडित म्हणाला, 'अहो माझ्यासमोर प्रत्यक्ष कालिदासाचे गुरु होते! त्यांना सामान्य प्रश्न तर विचारताच येणार नव्हते. मी त्यांना एक बोट दाखवलं आणि विचारलं, 'जगतामध्ये एकच तत्व आहे आणि ते केवळ शिव तत्व आहे.' तेव्हा त्यांनी दोन बोटं दाखवली आणि म्हणाले, 'गोष्ट खरी आहे, पण जग दोन तत्वावर आधारलेला आहे. एक शिव आणि दुसरी शक्ती अथवा प्रकृती व पुरुष.' मी पाच बोट दाखवली आणि दुसरा प्रश्न केला की, 'तत्व एक असो किंवा दोन. पण पंचेंद्रियांच्या योगे त्याला प्राप्त करून घेता येईल, ओळखता येईल.' तेव्हा त्यांनी मूठ दाखवून म्हटलं, पंचेद्रीय बांधलेली असतील, संयमीत असतील तरच ते शक्य आहे.' अशा प्रकारे तत्त्वज्ञान व दर्शनशास्त्र यांचं ज्ञान ते हेच नाही का! माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. या दोन्हीमध्ये ते पारंगत आहेत. त्यामुळे आणखी काय विचारायचं? मी हार कबूल केली. आता मला जाण्याची अनुज्ञा द्या.'

असं म्हणून प्रतिष्ठान पुरचा पंडित चालता झाला. तेव्हा मग राजाने गंगू तेल्याला आत बोलावलं. तो आज विजय झाला होता त्यामुळे त्याचा भाव देखील चांगलाच बदलला होता! तो आत मध्ये येताच राजाने त्याला म्हटले, 'चला, फार झालं हे तुझं सॉंग! पण आज तुझ्यामुळे आमच्या दरबारचा नावलौकिक टिकला आहे. तू जे मागशील ते मी तुला देतो! पण आधी तू त्या पंडिताच्या प्रश्नांना उत्तर काय दिलीस त्याचा तर खुलासा कर.'

गंगू तेली उद्गारला, 'महाराज! मी तर तुम्हाला कालच म्हणालो नव्हतो काय, हा पंडित विचारून विचारून काय विचारणार? माझा एक डोळा आहे तिरळा, तेव्हा त्या पंडिताने एक बोट दाखवून म्हटलं, 'तुझा दुसरा डोळा देखील फोडीन,' तेव्हा मी त्याला दोन बोटे दाखवली आणि म्हणालो, 'मी तुझे दोन्ही डोळे फोडून टाकेल.' मग त्याने मला पंजा दाखवला. त्याबरोबर मी त्याला बुक्का दाखवला आणि म्हणालो, 'तू मला समजतोस तरी काय? या बुकीने मी तुझा कपाळ मोक्षच करून टाकेल! बुक्का पाहिल्यावर पंडित घाबरला आणि त्यांनी हार मानली.'

भोज राजाला यश प्राप्त झालं आणि गंगू तेल्याला बक्षीस मिळालं! पण सांगण्याचा तात्पर्य की, जाणकार माणूस शहाणा असल्याने माझ्या माणसाने केलेल्या कृतीचही योग्य अर्थघटन करू शकतो. गणपतराव शूद्र आहे, पण विकार मात्र भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे ते बुद्धिमान आहेत. गणपतरावाच्या हातात माळ आली की विकास समजून जातात, आता आम्हाला गेलं पाहिजे.'

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन