“राख चढलेली आग”, “ पेट्रोल पंपाचं तत्त्वज्ञान
चैतन्याची राख झटकून माणसाच्या जीवनात चैतन्य हीच खरी संपत्ती आहे. पण ही संपत्ती जपली नाही, तर तिच्यावर राख साचते. सकाळी उठून दात घासत असताना मनात विचार येतो — “जग भले काहीही म्हणो, पण माझ्या हातात काहीच नाही; आयुष्य जसं चाललंय तसं ठीक आहे.” हा विचार म्हणजेच चैतन्यावर चढलेली राख. जशी अग्निदेवतेवर राख साचते आणि त्या राखेतून धूर निघू लागतो, तशी आपल्यावरही थकवा, उदासीनता, निरुत्साह, निराशा ह्या रूपाने राख चढते. पण लक्षात ठेवायचं — आग स्वतःहून विझत नाही. राख दूर केली, की ती पुन्हा तेजोमय होते. म्हणून आयुष्यात जेव्हा चैतन्य मावळायला लागतं, तेव्हा त्या राखेला ‘फू’ करून उडवून दिलं पाहिजे. ऋषींचे उपाय जुन्या काळचे ऋषी हे चैतन्य संरक्षक होते. ते आपल्या आश्रमात एखाद्या थकलेल्या, वैफल्यग्रस्त माणसाला वर्षभर राहायला सांगत. कारण त्यांना ठाऊक होतं — सत्संग, शास्त्र, साधना आणि निसर्ग यांच्या सहवासाने मनावरची राख आपोआप उडून जाते. एक वर्षानं तोच माणूस नव्या जोमाने, नव्या विश्वासाने जीवनाकडे परत पाहू लागतो. पेट्रोल पंपाचं तत्त्वज्ञान आजच्या काळात आपण दुसऱ्या भाषेत सांगू शकतो — गीता, उपनिषदे, स...