Mother's Heart | आईचे हृदय 💓

 




आईचे हृदय 💓

भगवंताचे प्रेम दैवी आहे. त्याला इंग्रजीत Divine love म्हणतात. आपण देखील प्रेमाची भाषा बोलतो परंतु आपले प्रेम आवश्यकते पोटी असते, आपले प्रेम निरपेक्ष, निराकांक्ष नसते. भगवान अपेक्षा किंवा आकांक्षा न ठेवता सर्वांना नियमित उठवतो. त्यामुळेच काही लोक पागल आणि उन्मत होऊन राक्षसासारखे बोलतात. 'मी भगवंताला नमस्कार करत नाहीत तरीही सकाळी उठतो का नाही? झोपताना भगवंताला नमस्कार करणे हा वेडेपणा आहे' असे ते बोलतात आणि असे बोलणाऱ्यालाही भगवान उठवतो. भगवंताला उघड उघड शिव्या देणाऱ्यालाही भगवान उठवतो. लोक भगवंताला शिव्या देतात त्याबद्दल जर भगवंताने थोडाही प्रताप दाखवला तर कोणाची ताकद आहे, कोणाची हिंमत आहे की भगवंता विरुद्ध एक तरी शब्द बोलेल? निर्लज्ज  लोक स्वतःला पंडित म्हणून घेण्यासाठी वाटेल तसे बोलतात.

जास्त निर्लज्ज माणसाला लोक जास्त बुद्धिमान समजतात. तो म्हणतो: 'भगवंताची गरजच नाही.' हे शब्द कसे उच्चारले जातात हेच त्याला माहीत नाही. तरीही तू बोलतो! भगवंताचे प्रेम निरपेक्ष , निराकांक्ष आणि अव्यय आहे. सत्ययुगात भगवान उठवत होता आणि कलियुगात उठवत नाही? दारुड्याला पण भगवान उठवतो आणि सात्विकालाही भगवान उठवतो. सात्वीकाला विकासासाठी शक्ती देऊन उठवतो आणि दारुड्याला तो सुधारेल अशी आशा ठेवून उठवतो. आई आशावादी असते. सर्व लोक याच्याबद्दल आशा सोडून देतात त्याच्याबद्दल त्याची आई आशा सोडत नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन