ब्रम्हर्षी तेजोमय गुरू
गुरू तोच – जो फक्त शिकवत नाही, तर जगण्यात सामावतो. तो जे बोलतो, ते लघु वाटतं, पण ते अंतरंग हलवून टाकतं. त्याच्या नजरेत प्रश्न नसतात,
फक्त दिशा असते.
तेज म्हणजे त्याचं आयुष्य – कधीही थांबत नाही,
कधी झगमग करत नाही, पण सारखं पेटलेलं असतं. त्याचं अस्तित्व म्हणजे दृष्टी, आणि दिशा
तो आपल्याला मंत्र देत नाही, तर मौनातच मंत्र उगमतो. तेजोमय गुरू कोणाचाही गुलाम नसतो, ना कोणी त्याला बांधू शकतो, कारण त्याचं गुरुत्व
ब्रह्माशी निगडित असतं. तो आपल्याला सांगत नाही — "माझ्यासारखा हो," तो म्हणतो — "तू तुझ्यासारखा हो — पण संपूर्ण हो." भूदेव म्हणून जो ओळखला जातो, तो गुरू नसतो केवळ, तो तेजाचा स्रोत असतो – जिथून साधना फुलते, आणि अंतःकरण स्थिर होतं.
प्रातः स्नात्वा देवपूजां च कृत्वा
दृष्टवा सूर्य भूमीदेवं च नत्वा |
दत्वा दानं भोजनं भोजयित्वा
स्वस्थो भूत्वा चिन्तयेत् वासुदेवम्||
असा ब्राह्मण हा 'भूदेव' मानला जातो. ब्राह्मणभोजन ही अत्यंत पवित्रतम गोष्ट आहे. ब्राह्मणाजवळ जाऊन, ब्राह्मणाच्या संसर्गात येऊन, इह जन्मानी जन्मान्तरे वा एक दिवस ब्रह्मसाक्षात्कार होण्याची शक्यता आहे. ब्राह्मण शांतरूप आणि तेजोरूप असतो. त्याने अंतर्भक्ती करून चित्त अतिशय मृदू बनवलेलं असतं आणि बहिर्भक्ती करून तो अतिशय तेजस्वी बनलेला असतो. त्याच्या जीवनात कर्मयोग व भक्ती शास्त्रीय दृष्टीने चालत असते. म्हणून तर त्याच्या जीवनात ब्रह्म विकसित झालेलं असतं. बाकी सगळ्यांच्या जीवनात ब्रह्म असत पण ते फुललेलं दिसत नाही. ज्यांच्या जीवनात ब्रह्म खुललेलं आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. अशा तेजोमय व शितल ब्राह्मणांचा संसर्ग प्राप्त करायला हवा. म्हणूनच आपल्याकडे सत्संगाला महत्त्व दिलेला आहे. सत्संग: सच्छास्त्रं भगवद्भक्ती प्रथम सत्संग, नंतर सत् शास्त्र आणि त्यानंतर भक्तीची सुरुवात.
श्राद्धाच्या दिवसात अशा ब्राह्मणाला नमस्कार करण्याची संधी मिळाली तर ती गमावता कामा नये. शंकराचार्यांनी ब्राह्मण त्वस्य ही रक्षणेन रक्षित: स्यात् वैदिको धर्म: असा उद्घोष केला आहे. हे सिंहाचे उद्गार आहेत, बकऱ्याचे बोल नव्हेत. ब्राह्मणात्वाचं रक्षण करून वैदिक धर्म उभा राहू शकतो. अशा ब्राह्मणाचं पूजन केलं पाहिजे.
ब्राह्मला मानणारा तो ब्राह्मण. जो ब्रम्हाला मानतो त्यांच्या संपर्कात आलं पाहिजे. 'माझा कोण?' जो भगवंताला मानतो तो माझा. जोपर्यंत ही गोष्ट पक्की होत नाही तोपर्यंत आम्ही खरे भक्त नाही. अर्जुन म्हणू लागला की, 'माझे आचार्य, पितामह वगैरे यांना मी कसा मारू?' त्यावर भगवंताने त्याला विचारलं, 'हे सगळे तुझे आहेत का?' जो भगवंताला मानीत नाही तो माझा मामा कसा होऊ शकेल! जो भगवंताला आणि संस्कृतीला मानीत नाही तो माझा नव्हे. मग तो भले कितीही मोठा असेन का! एखाद्याजवळ एकशे आठ गुण असतील, पण त्याने भगवंताला कधी मानलच नसेल तर तो माझा नाही; असं सांगण्याची हिंमत असली पाहिजे. ही स्पष्ट धारणा असेल तरच ब्राह्मण पूजन होऊ शकतं. म्हणून अंतकरणापासून ठरवा की, जो भगवंताला मानतो तोच माझा.
Comments
Post a Comment