शास्त्रोक्त कर्मयोग




कर्मयोग हे केवळ एक तात्त्विक तत्त्व नाही, तर ते स्वतंत्र शास्त्र आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये कोणत्याही संतांचा हवाला न देता स्पष्टपणे सांगितले आहे —

 "तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थिते।"

तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवायचं असेल, तर शास्त्र हाच आधार असतो. 'कोणी तरी भक्ती केली म्हणून आपण करायची', किंवा 'मनात आलं तसं करावं'—या गोष्टींना भगवंत मान्यता देत नाहीत. उलट तो सांगतो—

 "न स सिद्धीमवाप्नोति, न सुखं न परां गतिम्।"
(तो ना सिद्धी मिळवतो, ना सुख, ना परमार्थ.)

उदाहरणार्थ, गणपतराव भक्ती करतो, पण त्याच्या जीवनात न आनंद आहे, न समाधान. अशा भक्तीचा उपयोग काय? 'मेल्यावर सुख मिळेल' असा वायदा म्हणजे व्यवहारातल्या बाजाराचं आश्वासन ठरावं का?

खरं पाहता, कर्मयोग हा असा मार्ग आहे जो जीवनात तेजस्वीता निर्माण करतो. जेव्हा चित्त एकाग्र होतं, तेव्हा भागवत भक्तीने त्यात शितलता येते. आणि हीच तेजस्वी-शांत वृत्ती आपल्याला परम तत्वाच्या सान्निध्यात घेऊन जाते.

 जे शांतीरूप आणि तेजरूप असतात, त्यांच्याजवळ बसणे हेच साधनेसारखं आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन