साक्षीभाव

     
भूत आणि भविष्य काळात ताब्यात ठेवणारी जी आदिम शक्ती आहे ती माझ्या अंतरात वसलेली आहे आणि तीच सगळे भोग भोगते आहे, मी नाही. ही जाणीव आली तर अभ्यासू साधक असो की भक्त असो, तो सिद्ध साधक व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यात जर ही जाणीव जागृत झाली तर तो म्हणेल, 'भगवंताला या शरीराच्या मार्फत जे भोगायच असेल ते त्याने भोगावे. काय भोगायचं ते मी ठरवणार नाही. कर्म फळाचा भोक्ता भगवंत आहे, मी नाही. कारण कर्म फळेच त्यांची आहेत.'
     
'भगवंत साक्षी आहे आणि मी करता आहे' ही स्थिती जाऊन 'मी साक्षी आहे आणि भगवंत कर्ता आहे' ही स्थिती येणं तसं कठीणच आहे. आज आपल्या जीवनात भगवान साक्षीच्या ही भूमिकेत नाही. आपल्या इच्छा, वासना साक्षी आहे. नंतर अशी स्थिती येते की, भगवंत साक्षी आहे आणि मी कर्ता आहे. आणि त्याच्यानंतर एक वेळ अशी येते की, त्यांचे पाट बदलतात. भगवंत कर्ता आणि मी साक्षी अशी स्थिती प्राप्त होते. तेव्हा तो जीव म्हणतो, 'प्रभो! भोग तुला भोगायचे आहेत मला नाही. कारण कर्म तर तूच केलेली आहेस. मी नाही. तेव्हा कर्मफळे तुला भोगायचे आहेत. मी कर्म करतच नाही त्यामुळे कर्मफळ सुद्धा तुलाच भोगावे लागणार आहे. जी माझ्या खात्यावर आहेत हे मान्य, पण मी माझ्याकडे असली तरी ती माझी स्वतःची आहेत असं मात्र नाही.'
    
एखादी वस्तू आपल्याजवळ असली तर ती आपलीच असते असं नाही. गाडीत खूप गर्दी असते आणि त्यात एक दाम्पत्य गाडी पकडत. एकच जागा असल्याने नवरा आपल्या बायकोला तिथे बसायला सांगतो आणि आपण दरवाजाजवळ उभा राहतो. इतक्यात पुढचं स्टेशन येतं आणि डब्यात दुसरा एक जण शिरतो. ती स्त्री ज्या बेंचवर बसलेली असते त्यावर थोडी जागा होण्यासारखे असते. म्हणून तो नंतर आलेला माणूस तिच्या शेजारी बसलेल्या गृहस्थाला सांगतो, 'तुमच्या बायकोला जरा सरकायला सांगितलं तर मलाही थोडं बसायला मिळेल.' तेव्हा तो म्हणतो, 'कोणाची बायको!' त्या माझ्या शेजारी बसलेल्या असल्या तरी मी तीचा नवरा नाही. तिचा नवरा तो बघा तिथे दरवाजाजवळ उभा आहे.' अशाच तऱ्हेने महापुरुष भगवंताला सांगतात, 'प्रभो! कर्मफळे माझ्याजवळ असली तरी ती माझी नाही. त्याचा स्वामी तूच आहेस.' अशा प्रकारे ज्यांनी जीवनात भगवंताला बसवलंय ते संतच भगवंताजवळ पोहोचतात.

अनुभवाधारित तत्त्वज्ञानाचा सुंदर संगम इथे घडलेला आहे.

काही ठळक वैशिष्ट्ये:

1. ‘मी’ आणि ‘भगवंत’ यांच्यातील भूमिकांची अदलाबदल — 'मी साक्षी आहे, भगवंत कर्ता आहे' ही अवस्था एक गंभीर आध्यात्मिक परिपक्वतेची पातळी दर्शवते.

2. साधक ते सिद्ध — या प्रवासात ‘साक्षी’ ही जाणीव निर्णायक ठरते.

3. उपमा व दृष्टांत — भूमिका आणि मालकी यातील फरक सहज समजावतो.

4. भगवंताच्या भूमिकेचा उत्क्रांतीशील दृष्टिकोन — तीन पातळ्यांमधून (वासना साक्षी → भगवंत साक्षी → भगवंत कर्ता.)

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन