'भगवत स्पर्शी जीवन'


    
म्हणूनच उपनिषद समजावते आहे की, वरान् प्राप्य निबोधत| एखाद्या श्रेष्ठ पुरुषाला प्राप्त करा. आता असा श्रेष्ठ पुरुष कोण? जो दुसऱ्यांना प्रवृत्त करू शकतो, धावायला लावू शकतो त्याला श्रेष्ठ म्हणतात. स्वतः धावणारे पुष्कळ पाहतो आपण. पण धावायला लावणारे कमीच असतात. ती शक्ती निराळीच आहे की जी धावायला लावते. आपलं शास्त्र सांगत की, अशा वर पाशी सात अलंकार असले पाहिजेत. ते सात अलंकार असतील तर तो परिपूर्ण वर गणला जातो. आता हे अलंकार कोणकोणते आहेत?
     
'भगवत स्पर्शी जीवन' हा पहिला अलंकार आहे. ज्याचं जीवन इशस्पर्शी आहे, ज्याच्या जीवनात ईश्वराचा प्रेमस्पर्श आहे त्याच्यात सगळ्या शक्ती येतात. त्याच्या प्रेमाला खराखुरा वात्सल्यभाव म्हणता येईल. कांतासक्ती किंवा वात्सल्य सक्ती या दोन्ही भावापेक्षा निराळा असा हा भाव आहे. एखादा माणूस वारला असेल तर आपण त्याच्या कुटुंबाच्या समाचाराला जातो. त्याचा सतरा अठरा वर्षाचा मुलगा रडत बसलेला असतो. भले त्याचा बाप आयुष्यभर काहीही न करता गंजून गंजून मेलेला असला तरी लहान वयात बापाचं छत्र हरपलेल्या अशा त्या मुलाला पाहून आपल्या मनात कारुण्य उद्भवतच. त्याला रडताना पाहून आपण त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, 'बाळ! दुःख आवर. तुझे वडील गेले असले तरी आकाशातला पिता आहे की नाही?' असंच काही ना काही आपण त्यावेळी बोलतो. अर्थात आपण दुसरं काय बोलू शकणार! आणि त्या मुलाला तरी त्यातलं काय कळत असणार! मात्र असं काहीतरी बोलल्याशिवाय गत्यंतरच नसतं. आणि नाही बोलायचं तर काय तिथे गुम्यासारखं जाऊन बसायचं? तेव्हा अशावेळी काही बोलणं भागच असतं. परंतु आपण असं जे काही बोलतो त्याला प्रत्येक वेळी अर्थ असतोच असं नाही.
    
अशा प्रकारे आपण त्या दुःखी मुलाच्या पाठीवरून कारुण्याने हात फिरवून त्याचं सांत्वन करत असतो, आश्वासन देत असतो. पण त्या हातात कांतासक्ती किंवा वात्सल्यसक्तीचा भाव असत नाही. तर दुसरं असं की, भगवंतापाशी रडणारा माणूस इशस्पर्शी जीवनाची व्यक्ती नाही. जेव्हा माणसाच्या जीवनातून भगवंता समोरच रुदन आणि भगवंताकडून च्या मागण्या या दोन गोष्टी बंद होतात तेव्हा त्या जीवनाला प्रभूचा स्पर्श होतो. आणि तोच खरा भगवत स्पर्श आहे. अर्थात भगवंताचा स्पर्श इतरांना नाही होत असं नाही; स्पर्श होतो, पण तो कसा की, 'बेटा तेरा भला हो जायेगा', 'कोणीतरी तुझी काळजी नक्कीच घेईल!' अशा बाप मेला म्हणून रडत बसलेल्या मुलांना नातेवाईक काय सांगतात, 'बाळ तू रडू नकोस. वडील गेले म्हणून काय झालं, काका तर आहेतच ना? हे तुझा संभाळ करतील.' म्हणजे बोलणारा त्याच्या जबाबदारीतून सुटला.
    
'भगवंत कोणाला तरी पाठवेल तू रडू नकोस.' या आश्वासनात कांतासक्ती अथवा वात्सल्यासक्तीचा सुद्धा भाव नाही. अर्थात जो माणूस फक्त भगवंताजवळ रडत असतो आणि त्याच्याकडे मागणी करत असतो तो माणूस मोठाच आहे त्यात शंकाच नाही. कारण की तो दुनियाकड न रडता भगवंताकडे रडत असतो. म्हणून त्याच्यापेक्षा मोठा कोण असणार? मात्र अध्यात्मात तो वर म्हणजे श्रेष्ठ पुरुष नाही. त्याला प्रभू स्पर्श झालेला आहे हे खरं. परंतु त्या स्पर्शात कांतासक्ती किंवा वात्ल्या सक्तीचाही भाव नाही.

 "भगवत स्पर्शी जीवन" या पहिल्या अलंकाराच्या अर्थमूल्यावर अतिशय प्रभावी आणि विचारप्रवृत्त करणाऱ्या शैलीत भाष्य करतं. येथे 'भगवत स्पर्श' म्हणजे केवळ भावनिक आधार किंवा आश्वासक बोलण्यापलीकडे जाणारी एक अंतःप्रेरणा आहे—जिथे भक्ताच्या मागण्यांचाही अंत होतो आणि केवळ भगवंताशी एकात्मता उरते.

पित्याच्या निधनानंतर मुलाला दिलं जाणारं सांत्वन. यातून मानवी संवेदनांचा मर्यादित अविष्कार आणि भगवद्भावाचा गूढ स्पर्श यांच्यातील फरक ठळकपणे स्पष्ट होतो. 'रडणारा मोठा, पण मागणं थांबवणारा श्रेष्ठ. जो भगवंताच्या सान्निध्याच्या खऱ्या अनुभूतीकडे नेतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन