Self-discipline of the senses | इंद्रियाची स्वाधीनता


           
इंद्रियाची स्वाधीनता केव्हा येते? जेव्हा जीवनात निरपेक्षता येते तेव्हा अशी स्वाधीनता येते. इंद्रिय दमन म्हणजे नियंत्रित जीवन. त्यासाठीच तर धर्म आणि नीतीचे नियम आहेत. माणसाचं जीवन नियंत्रित असलं पाहिजे. त्यासाठी जीवनात अंकुश हा असलाच पाहिजे. निरंकुश जीवन चालणार नाही. परंतु त्याच्यानंतर ची पायरी आहे इंद्रियस्वाधीनता. जीवनात निरपेक्षता आली तर इंद्रियस्वाधीनता येते. जोपर्यंत बुद्धी अपेक्षांचे डोंगर रचत असेल तोपर्यंत मन स्वाधीन राहणार नाही. जितक्या प्रमाणात निरपेक्षता जीवनात उतरेल तितक्या प्रमाणात मनाची स्वाधीनता येईल. त्यानंतर इंद्रियपवित्रता आणि इंद्रिय प्रसन्नता देखील साधली पाहिजे. इंद्रिये विजयासाठी या चार गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत. योगदर्शनात त्याचं फार विस्ताराने वर्णन आहे. अर्थात विस्ताराने म्हणजे भारंभार वर्णन नाही, तर थोडक्यात सूत्रबद्ध पद्धतीनेच ते आहे पण त्यात या सगळ्यांचा उल्लेख आहे.
   
इंद्रियपवित्रता ही फार मोठी मानसिक प्रक्रिया आहे. ज्या माणसाची इंद्रिय पवित्र असतात त्यांची नजर सुद्धा पवित्र असते. अशा एखाद्या माणसाची मायेची नजर आपल्यावरती पडली तर आपलं कल्याण होईल. मायेची नजर म्हणजे निष्पाप माणसाची निरपेक्ष नजर आपल्यावर पडली तर आपलं निश्चितच कल्याण होईल. अशा माणसाच्या नजरेत शक्ती असते. त्यांच्या नजरेला आपण पडण ही फार मोठी गोष्ट आहे. अशा महापुरुषांच्या नजरेला आपण पडलं पाहिजे. अर्थात केवळ महापुरुषांच्या नजरेला पडूनच नाही चालत आपल्याला पाहिल्यावर त्या महापुरुषाच्या हृदयात मायेचा दर्या उचंबळून आला पाहिजे. तर आपल्यावर पडलेली त्यांची नजर परिणाम कारक ठरते. नाहीतर त्याचाही काही उपयोग होत नाही.
     
इंद्रिय प्रसन्नता म्हणजे माणसाची सगळी इंद्रिय प्रसन्न असणं आणि आपले सगळे इंद्रिय प्रसन्न आहेत की नाहीत हे नजरेतून दिसतं. कारण की सगळ्या इंद्रियामध्ये प्रमुख आहे तो आपला डोळा. डोळ्यांनी जर सहमती दर्शवली तर समजून चला की सगळी इंद्रिय प्रसन्न आहेत. माणसाच्या जीवनाची प्रसान्नता डोळ्यात दिसते आणि आषाळभूतता सुद्धा डोळ्यात दिसते. अध्यात्माच्या दृष्टीने आणि शरीर शास्त्राच्या दृष्टीने देखील डोळे हे अतिशय महत्त्वाचे इंद्रिये आहेत. 
    
शरीराचा रोग डोळ्यात पारखता येतो आणि आध्यात्मिक विकास देखील डोळ्यात दिसतो. त्यामुळे सगळ्याच इंद्रियामध्ये प्रसन्नता आहे की नाही त्याची पारख डोळ्यावरून करता येते. आता डोळे पारखणारा आध्यात्मिक डॉक्टर असेल तर तोच तुमच्या डोळ्यावरून सांगू शकतो की, 'तुमच्या मनात काय आहे.' पण मुळात तो आपली शक्ती त्यासाठी वापरेल तर ना! सामान्यता: असे महापुरुष अशा शिल्लक कारणासाठी आपली आध्यात्मिक शक्ती वापरत नाहीत, ही स्वतंत्र गोष्ट आहे. इंद्रिये दमन, इंद्रियस्वाधीनता इंद्रियपवित्रता, आणि इंद्रियप्रसन्नता या चार गोष्टी आल्या म्हणजे मगच त्याला इंद्रिये विजय म्हणतात.
   
त्याच्यानंतर येतो मनोविजय. तत्त्वज्ञान सांगते की, मन आणि बुद्धी ही केवळ इच्छापूर्तीची कल्पनानिष्ठ साधने आहेत.

 काही मुद्दे अधिक स्पष्ट करता येतील:

1. इंद्रिय दमन आणि इंद्रियस्वाधीनता यातील अंतर:

इंद्रिय दमन हे जबरदस्तीने नियंत्रण ठेवण्यासारखे आहे, तर इंद्रियस्वाधीनता ही एक नैसर्गिक अवस्था आहे जी आत्मिक प्रगल्भतेतून येते.

योगदर्शनात याला 'प्रत्याहार' म्हणतात, ज्यामध्ये इंद्रिये विषयाकडून निवृत्त होतात आणि अंतर्मुख होतात.

2. नजर आणि आध्यात्मिकता:

'महापुरुषांच्या नजरेचा प्रभाव' हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा प्रभाव नेमका कसा कार्य करतो? केवळ त्यांच्या अंतःकरणातील प्रेम आणि निष्पापतेमुळे की त्यांच्या आध्यात्मिक उर्जेमुळे?

याबाबत वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांमध्ये स्पष्टीकरण आहे, जसे की भगवद्गीतेत ‘ज्ञानदृष्टी’ आणि संत परंपरेत 'दिव्यदृष्टी' यांचे उल्लेख.

3. इंद्रिय प्रसन्नतेचे लक्षण:

डोळे हे इंद्रियस्थितीचे सूचक असतात, याची आधुनिक मानसशास्त्रातही पुष्टी होते.

पण इंद्रिय प्रसन्नता कशी मिळवायची? त्यासाठी ध्यान, साधना, आणि संतुलित जीवनशैली या घटकांबाबत अधिक माहिती देता येईल.

   1. इंद्रियस्वाधीनता आणि निरपेक्षता यांचा संबंध:

       जीवनात निरपेक्षता आली की इंद्रियस्वाधीनता कशी मिळते, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

       बुद्धीच्या अपेक्षांमुळे मन अस्थिर राहते, आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी निरपेक्षता आवश्यक आहे.

  2. इंद्रियपवित्रतेचे महत्त्व:

      संत तुकाराम महाराजांचे उदाहरण दिले आहे, ज्यांनी आपल्या पवित्र दृष्टीमुळे अनेकांच्या जीवनावर प्रभाव              टाकला.

      महापुरुषांच्या सहवासातील ऊर्जा आणि नजरेच्या प्रभावावर भर दिला आहे.

  3. इंद्रियप्रसन्नतेची लक्षणे:

     डोळे हे अंतर्मनाचा आरसा आहेत, आणि इंद्रियांची प्रसन्नता डोळ्यांतून दिसते, हे स्पष्ट केले आहे.

     शरीरशास्त्र आणि आध्यात्म दोन्ही दृष्टिकोनातून डोळ्यांचे महत्त्व मांडले आहे.

  4. इंद्रिय विजय आणि मनोविजय:

      इंद्रिय दमन, स्वाधीनता, पवित्रता आणि प्रसन्नता साधल्यानंतर इंद्रिय विजय प्राप्त होतो.

      त्यानंतर अंतिम टप्पा म्हणजे मनोविजय, जो भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञतेच्या तत्त्वाशी जोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन