भक्तांच्या कल्याणासाठी भगवंताची किमया


 
भक्त आणि जगदीश दोघे बसलेले असतात त्यावेळी भक्त विचारतो, 'देवा! हा सगळा जगाचा पसारा तो कशाकरता मांडला आहेस? तुझं त्यात काय गुह्य आहे? तुझी गुप्ताहूनही गुप्त गोष्ट मला सांग ना! हे जग कोणी बनवले आहे हे सांग ना!'
     
त्यानंतर भावपूर्णतेची भाषा सुरू होते. भगवंत भक्तापाशी इतका बोलला तरी भक्ताला असं वाटतं की भगवंत त्रयस्थासारखा बोलतो आहे. म्हणून मग तो भगवंतापाशी ज्ञानासोबतच भावमयतेने बोलायला लागतो. तेव्हा भगवान त्याला हळूच सांगतो, 'तुला माहित आहे काय? मीच ही सृष्टी निर्माण केली आहे आणि हे सगळे लोक सुखी राहावेत म्हणून मी जगाकडे पाहतो आहे. सर्वेऽत्र सुखीन: सन्तु सर्वे सन्तू निरामया:| सर्वे भद्राणि पश्चन्तू मा कश्चित् दुःखमाप्नुयात्|| याचसाठी तर मी या जगाकडे लक्ष ठेवून आहे.' आता हे सुद्धा भगवंताचे स्टेटमेंट आहे.
      
परंतु ही देखील गुह्य गोष्ट नव्हे. त्याच्याहूनही आतल्या गोठातली मोठी गोष्ट जाणून घेतली पाहिजे. 'मी अवघ्या दुनियेसाठी ही सृष्टी बनवली' इतकं ऐकून देखील या भक्ताचे समाधान होत नाही. याज्ञवल्क्य इतके पोहोचलेले आहेत की भगवंताने इतकस सांगून देखील ते त्याच्यापुढ्यातून उठत नाहीत. कारण याज्ञवल्क्यांनी निश्चित केल आहे की भगवंतने अमुकेक बोलल्यानंतरच त्याची पाठ सोडायची. काही काही माणसांना देवाने जरी इतकं सांगितलं तरी ते इतकं हरकून जातात आणि म्हणतात, 'परमेश्वर आपल्याशी बोलला ना! बस तर भरून पावलं!' पण याज्ञवल्क्य सारख्या भक्तांना इतक्यानेही तृप्ती नाहीच. इतका अतृप्त माणूस विश्वात नसेल! ते म्हणतात, 'अहो परमेश्वर बोलला त्यात काय विशेष आहे?'
    
तेव्हा भगवंत त्यांना सांगतो, 'याज्ञवल्क्य! मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं आहे. ही गोष्ट खरंतर मी कोणालाही सांगत नाही की ही सृष्टी मी बनवली आहे.' खरंच आहे ते! फुल फुलवलं भगवंताने पण त्याच्यावर त्याने आपलं नाव लिहिलंय का? सूर्योदय, सूर्यास्ताचे वेळी आकाशात तोच तर रंग उधळतो, पण तिथे त्यांनी आपलं नाव कोरून ठेवलय काय? नाही कोरलेलं. पण याज्ञवल्क्यसारख्या भक्तांच्या कानात भगवंतच हळुवार सांगतो की, 'अरे, हे सगळं मीच उभं केलं आहे. ही सृष्टी मीच निर्माण केली आहे आणि ती लोकांसाठी निर्माण केली आहे. सगळे सुखी राहावेत म्हणून मी या जगाकडे पाहतो आहे.'
     
पण इतकं सगळं ऐकल्यानंतरही याज्ञवल्क्य भगवंताच्या पुढ्यातून उठत नाहीत. तेव्हा भगवंत अगदी लडिवाळ भावाने याज्ञवल्क्यांच्या पाठीवरून हात फिरवत फिरवत सांगतो, 'बाळ, काय सांगू मी तुला! तुला तर माहीतच आहे की मी ही सृष्टी निर्माण केलेली नाही, ही गोष्ट खोटीच आहे. माझ्याशिवाय ही सृष्टी निर्माण होईलच कशी? पण दुसरं असं की, या सगळ्या लोकांसाठी मी ही सृष्टी निर्माण केली आहे ही गोष्ट सुद्धा खोटीच आहे. बाळ! मी तुझ्यासाठी ही सगळी निर्मिती केली आहे. तू इथे सुखी रहावास एवढ्यासाठी मी हे सगळं केलं आहे. मी या सृष्टीकडे पाहतोय. अगदी चोवीसचे चोवीस तास पाहतोय. पण कशासाठी हे तुला माहित आहे का? मला या गणपतराव - शंकरराव कडे पाहायचं नाही. मला तुला पाहिची इच्छा आहे आणि तू या सगळ्या लोकांमध्ये जाऊन बसला आहेस. त्यामुळे मला या लोकांकडं पहावं लागतं. पण माझी नजर काही लोकांकडं नाही. माझी नजर निरखत असते ती कोणाला?
 प्रल्हादनारदपराशरपुंडरीक- व्यासाम्बरीषशुकशौनकभीष्मदाल्ब्यान्|  सगळ्या लोकांकडं मी चोवीस चोवीस तास पापणी सुद्धा न लववता, अगदी अनिमेष नेत्रानी पहात बसलो आहे. परंतु माझी नजर या सृष्टीकडे अजिबात नाही, तर मला तुझ्याकडे पाहायचा आहे. पण हा माझा भाव मी कुणाला सांगू? सगळ्या लोकांना जर मी हे सांगितलं तर लोक म्हणतील, आमच्यावरच काहीच भाव नाही?' पण हेच खरं आहे की, मी तुला पाहतो आहे, पण सगळे लोक असे समजतात की, भगवंत सगळ्यांना पाहतो आहे'.

ही कथा अत्यंत गूढ आणि भावपूर्ण आहे. याज्ञवल्क्य आणि भगवंत यांचा हा संवाद भक्ती, जिज्ञासा आणि सखोल आध्यात्मिक संवादाची गहिरी अनुभूती देतो.

याज्ञवल्क्यांसारख्या जिज्ञासू ऋषींची भूमिका विशेष आहे. त्यांना भगवंताने दिलेले वरवरचे उत्तर समाधानकारक वाटत नाही. ते अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करतात. भगवंत आधी संपूर्ण विश्वासाठी सृष्टी निर्माण केल्याचे सांगतात, पण शेवटी एक अत्यंत गूढ सत्य उलगडतात—ही संपूर्ण सृष्टी याज्ञवल्क्यांसाठी, किंवा अशा अतिशय भक्तांसाठी आहे.

हा संवाद भगवंताच्या दृष्टीने भक्तांचे स्थान किती विशेष आहे हे स्पष्ट करतो. सामान्य लोकांसाठी तो विश्वनिर्माता आहे, पण खरी गोष्ट भक्तांसाठी अधिक खास आहे—तो त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. हा दृष्टिकोन गीतेतील "भक्तांना मी विशेष प्रिय आहे आणि ते मला प्रिय आहेत" या विचाराशी सुसंगत आहे.

या कथेत भक्ती, ज्ञान आणि भगवंताचे आत्मीय प्रेम यांचा सुंदर संगम घडवला आहे. 

1. याज्ञवल्क्यांची आतली तगमग –

भगवंताने उत्तर दिल्यानंतरही त्यांचे मन शांत का होत नाही?

त्यांच्या विचारांचा प्रवाह कसा असतो?

त्यांना जे काही ऐकायचे आहे, ते नेमके काय आहे?

2. भगवंताशी संवाद करताना त्यांचे भावविश्व 

भगवंताशी बोलताना त्यांच्या आवाजात कधी कुतूहल, कधी आवेग, कधी भावविभोरता असे विविध रंग दाखवता येतील.

3. भगवंताचे प्रत्युत्तर –

भगवंत लडिवाळ भावाने बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामागचा एक गंभीर गूढ भाव अधिक ठळक करता येईल.

भगवंताने "मी तुला पाहतोय" असे म्हणतानाचा त्यांच्या अंतःकरणातील प्रेमळ पण तरीही अपार विराटपणा अधिक स्पष्ट करता येईल.

4. समाप्तीचा प्रभाव –

शेवटी, भगवंताने आपली नजर भक्तांवरच असते हे सांगताना, याज्ञवल्क्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो?

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन