Posts

Showing posts from March, 2025

The path to self-realization

Image
आत्मतत्व मिळवण्यासाठ भक्ती समजावली होती आणि ती देखील उच्च कोटीची भक्ती समजावली होती. त्याप्रमाणे उपनिषद समजावते आहे की संसारात राहून देखील आत्मज्ञान मिळवायचं असेल तर भक्तीच्या सोबतच शुद्ध आचरण, पवित्र आचरण, इंद्रियांचा उपशम, शुद्ध वर्तन करणारी इंद्रिये आणि समाहित चित्त म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि या सर्वांच्या सोबतच स्वतःच्या कह्यात असलेले समाधानी मन - इतक्या गोष्टी जीवनामध्ये मिळवल्या पाहिजेत. हे सर्व घडून आलं तर आत्मतत्व मिळवणं शक्य आहे, नाहीतर नाही. केवळ ज्ञानाने ते मिळवता येणे शक्य नाही.      म्हणूनच आपल्या जुन्या काळच्या लोकांनी सांगून ठेवल आहे की, जर आत्मज्ञान मिळवायच असेल तर पहिल्यांदा तीर्थ स्नान करा. पण त्याच्यामुळे काय झालं की लोक तीर्थाटनाला जाऊन तिथे स्नान करायला लागले. आणि ते देखील रिटर्न तिकीट काढून घ्यायला लागले! परंतु जुन्या काळच्या लोकांनी जे तीर्थ स्नान करायला सांगितला आहे त्याचा अर्थच निराळा आहे. तीर्थस्नान करण्यासाठी अमुकच ठिकाणी जाण्याची गरज काय? आपल्या पूर्वजाने सप्ततिर्थात, सप्तकुंडात स्नान करा असं सांगितलं आहे. ती सप्ततिर्थ कोणती? ती स...

गुढीपाडवा | Gudi Padwa

Image
गुडी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, जो विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला येतो आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. गुडी पाडव्याचे महत्त्व: 1. हिंदू नववर्षाचा प्रारंभ: शक संवत्सराची सुरूवात याच दिवशी होते. 2. रामाच्या विजयाचे प्रतीक: अशी मान्यता आहे की प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला, त्यावेळी लोकांनी विजयाची निशाणी म्हणून घरासमोर गुडी उभारली. 3. शुभ आरंभाचा दिवस: नवीन व्यवसाय, उपक्रम किंवा शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुडी पाडव्याच्या पारंपरिक प्रथा: घरासमोर गुडी उभारली जाते. ही गुडी काठीवर रेशमी वस्त्र, फुलांचा हार आणि कडुलिंबाची पाने लावून तयार केली जाते. घराची स्वच्छता व रांगोळी काढून मंगलमय वातावरण तयार केले जाते. कडुलिंबाचा पाला खाण्याची प्रथा आहे, कारण ती आरोग्यासाठी लाभदायक असते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पूजा आणि धार्मिक विधी केले जातात. आधुनिक संदर्भात गुडी पाडवा आजच्या काळातही गुडी पाडवा हा पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. अनेक ...

श्रेष्ठातिश्रेष्ठ ब्रह्मानंद

Image
जेव्हा एखादा भक्त फार उच्च स्तरावर पोहोचतो, तेव्हा भगवंत त्याच्यावर अत्यंत प्रेम करतो. म्हणूनच तो त्याला म्हणतो, 'तू माझा आहेस.' अशा भक्ताला भगवंत स्वतः स्वीकारतो. तरीही, अशा भक्ताच्या प्रेमविव्हळतेतून निर्माण झालेली कर्मयोग परायणता अखंड चालूच असते. त्याच्या जीवनात विशुद्धता आहे, भावपूर्णता आहे, भगवंताबद्दलची प्रेमविव्हळता आहे आणि त्यातून उत्पन्न होणारी निरंतर कर्मयोग परायणता आहे. हे सगळं जेव्हा त्या भक्ताच्या जीवनात प्रकट होतं, तेव्हा भगवान त्याच्या कानात येऊन सांगतो, 'मुला! मी तुझा आहे.' म्हणूनच उपनिषद सांगते की, हा श्रेष्ठातिश्रेष्ठ ब्रह्मानंद आहे. असा ब्रह्मानंद मिळवणं ही अत्युच्च स्थिती आहे. कोणी म्हणेल, 'तर मग! अशी आकाशामधली स्थिती आम्हाला काय कामाची?' पण वास्तव असा आहे की, आपल्याला त्या स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे. आज नाहीतर उद्या, कितीही जन्म लागले तरी शेवटी आपण तिथे पोहोचणारच! आपलं जीवन शोकांतिका नाही, तर सुकांतिका आहे. म्हणूनच हे समजून घेतलं पाहिजे. अध्यात्मात वेडेपणा आणि भोळसटपणा उरता कामा नये, म्हणून हे जाणून घेणं आवश्यक आहे. उपनिषद किती स...

Different levels of devotion

Image
               त्याच्यानंतर, पुष्कळ वर्षानंतर अथवा कित्येक जन्मानंतर मग भगवंत म्हणतो, 'मुला! तू माझा आहेस'. परंतु ही गोष्ट आपल्या हातातली नाही. म्हणूनच सांगितलं आहे की, भगवान कृपा साध्य आहे. 'तू चांगला आहेस' असं म्हटल्यानंतर भगवंत काही जन्मापर्यंत वाट सुद्धा पाहायला लावतो आणि त्या जीवाची परीक्षा सुद्धा करतो. 'कदाचित नंतरच्या जन्मात तो पतभ्रष्ट झाला तर?' भगवंताला असं वाटतं की, 'त्याला जरा वैभव देऊन पाहूया आणि तो बिघडतो का ते तपासूया.'          भगवंताने त्याला 'तू चांगला आहेस' असं म्हटल्यानंतर देखील त्याच्या जीवनाची विशुद्धता, सृष्टीबद्दलची भावपूर्णतः, विश्वंभरा बद्दलची प्रेमविव्हळता आणि त्यामधून निर्माण झालेली कर्मयोग परायणता जर अविरत सुरू राहिली तर त्याचे चित्तएकाग्रता वाढत जाते. आणि त्याच्यानंतर भगवंत त्याच्या पाठीवरून हात फिरवीत कानात सांगतो, 'मुला! तू तर कमाल केलीस. तू माझा आहेस.'       भगवान त्याचा स्वीकार करतो. म्हणजेच आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा हात मागून घेऊन भगवंत लग्न...

The Power Of Listening Devotion

Image
श्रवण ही एक मोठी शक्ती आहे. श्रवण शक्तीच्या योगेच जीवनात विशुद्धता येते. केवळ श्रवणशक्ती द्वारेच सृष्टीकडे पाहण्याचा भावपूर्ण दृष्टिकोन विकसित होतो आणि विश्वंभराबद्दल प्रेमविव्हळता निर्माण होते. या सगळ्या गुणांचं बिजारोपण करण्याचं काम श्रवणानेच होतं आणि  श्रवणाद्वारेच ते गुण क्रमशः उत्कर्ष पावतात. श्रवण माणसाला नैतिक बनवतं, श्रवण माणसाला चांगला बनवत. अशा प्रकारे श्रवणाद्वारे माणसात उच्चता येते. आपण श्रवण करू लागलो की असे एक एक गुण भगवन पाठवायला लागतो.        श्रवणाचे पुष्कळ प्रकार आहेत. भगवंताबद्दल जे सांगितलं आहे त्याच श्रवण हा पहिला प्रकार आहे. त्यात भागवत इत्यादी ग्रंथाचा समावेश होतो. हे प्राथमिक श्रवण आहे. त्याच्यानंतर भगवंताने सांगितलेल्या वाङ्मयाच श्रवण हा दुसरा प्रकार आहे. गीता, उपनिषद इत्यादी ग्रंथ अशा प्रकारच्या वाङ्मयामध्ये मोडतात. पण प्रत्येक ठिकाणी भावपूर्ण अंतकरणाने श्रवण अपेक्षित आहे. प्रथम भगवंताबद्दल जे सांगण्यात आलं आहे त्यांचं श्रवण करायचं. आणि त्याच्यानंतर भगवंताच्या मुखारविंदातून निघालेलं असं जेव्हा आहे ते ऐकायचं. इथपर्यंत आल्यावर मग माणस...

REALISATION OF BRAHMA

                   तत्त्वज्ञान केवळ बौद्धिक विषय न राहता अनुभूतीचा विषय बनला पाहिजे. भारतीय परंपरेला अनुसरून सांगायचं तर मुखाने विशुद्ध तत्त्वज्ञान सांगणारा आणि हाताने कत्तलखाने चालवणारा स्टॅलीन भारताचा आदर्श बनू शकत नाही. याचं कारण तत्त्वज्ञान हा केवळ डोक्याचा अथवा बुद्धीचा विषय म्हणून नुसत्या उड्या मारणारे असे हे सगळे लोक आहेत.     भारतीयांनी केवळ तत्वचिंतन केलं नाही तर त्यांनी ते तत्व पाहिलं आहे, अनुभवलं आहे. उपनिषद काळापासून जर या भारत भूमीवर एखाद्या गोष्टीला मोठ्यात मोठी किंमत असेल तर ती भावजीवनाला आणि अनुभूतीवादाला आहे. उपनिषद सांगते की, या आत्मतत्त्वाचा ज्याला अनुभव आला आहे तो माणूस न शोचती - शोक करत नाही, रडत बसत नाही. या तत्त्वाची अनुभूती झालेले लोक, 'मला जन्म नको' अशी मागणी कदापी करत नाहीत आणि 'देवा! केव्हा आम्हाला या जगाच्या जंजाळातून सोडवाल?' असे देखील बोलत नाहीत. उलट अशा लोकांचा आग्रह सुरू असतो की, :या जगात मला पुन्हा जन्म दे.'      अशी या लोकांची मागणी असते. याचं कारण काय? ब्रह्मज्ञानाचा अनुभव ही एक...