Seven Steps of Knowledge | ज्ञानाच्या सात पायऱ्या - स्मृती

 

         

अध्यात्म जिज्ञासेतून सुरू होते. कंटाळलेला माणूस अध्यात्मिक बनू शकत नाही. आपण अध्यात्म शब्दाच्या अर्थाच्या बाबतीत विचार करत होतो. आपल्या आत भगवंताने ठेवलेल्या गोष्टीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत मन आणि बुद्धी आहे. बुद्धीमध्ये बोधनात्मक क्रियांची क्षमता आहे. बोधनात्मक क्रियांच्या क्षमतेत प्रथिमा,बोधन, कल्पना, स्मृती, संकल्प, निग्रह यासारख्या गोष्टी भरून भगवंताने हे सर्व उभे केले आहे. आपल्या मानसशास्त्र धारणा, प्रत्यावाहन, आणि प्रत्यभिज्ञ हे शब्द आहेत.

भगवंताने स्मृती दिली आहे ते अफलातून आहे. स्मृर्ती तर लाजवाब आहे. स्मृती आहे म्हणूनच विकार उभे राहतात, विचार उभे राहतात, जीवन सुरू होते. मी कधीतरी श्रीखंड खाल्ले असेल त्याची स्मृती आहे. ही स्मृती मला वारंवार हैरण करते. मला वारंवार श्रीखंड खायला मिळावे म्हणून मी पुन्हा पुन्हा श्रीखंड बनवण्याचा प्रयत्न करतो. मला रोज श्रीखंड खायला मिळावे म्हणून पैसा कमावतो. हा स्मृतीचा परिणाम आहे. एखाद्या वेळेस एखादा रस चाखला, अनुभवला ते जर नंतर आठवलेच नाही तर मग लालसा, कामना उभीच राहणार नाही. भगवंताने आत ह्या शक्ती ठेवल्या आहेत. तीच भगवंताची माया आहे. माया देवाने निर्माण केली आहे. आपण ती उभी करू शकत नाही.

भगवंताने स्मृती दिली आहे ती वरदान आहे की शाप? शाप तर नाहीच पण तसे वाटते ते मायेमुळे वाटते. बुद्धीमध्ये स्मृती एक बलवान शक्ती आहे. स्मृतीमुळे सगळ्या गोष्टी होतात. स्मूर्तीचा पहिला घटक आहे नोंदणी, दुसरा घटक आहे धारणा म्हणजेच अनुभवांचा संग्रह करणे. समजा एखाद्या सुगंधाचा अनुभव आला की त्याचा संग्रह होतो. अनुभव वेगवेगळे आहेत, पण अनुभवाचा संग्रह सांभाळण्याची शक्ती आत भरलेली आहे. काही वस्तू समोर आल्यानंतर विचार केल्यानंतर, कोणी सांगितल्यानंतर स्मरणात येतात.  स्मृती शक्तीचे हे चार घटक प्रभावी आहे. प्रथम नोंदणी होते, नंतर धारणा होते, मग स्मरण होते आणि शेवटी ओळख होते. या स्मृतींचा चांगला प्रकारे उपयोग केला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन