पंतग | Importance of Kite in life
जोपर्यंत पतंगाची दोरी माणसाच्या हातात आहे तोपर्यंत आकाशात विहीरत असतो. एकदा का दोरी माणसाच्या हातून सुटली की तो पतंग भरकटतो आणि कुठेतरी लटकत पडलेला असतो. हा पतंग जेव्हा आकाशात उंच उडत असतो तेव्हा आपल्यासारख्या माणसाला म्हणतो, 'तू वाटेल तेवढे वेद, उपनिषदे, शास्त्र शिकला असशील पण माझ्याकडे बघ! तू तर फुटपाथवरून चालतोस आणि मी आकाशात उडतो आहे!' परंतु एकदा त्याची दोरी हातातून सुटू द्या की मग दुसऱ्या दिवशी त्याचे रूप पाहण्यासारखे असते! तो कुठल्यातरी ठिकाणी लटकत पडलेला दिसतो. त्याचे रंगरूप पार फिके पडलेले असते, फाटक्या तुटक्या अवस्थेला तो पोहोचलेला असतो!
अशीच गत एखाद्या गणपतरावाची होते. जोवर देवाच्या हातात त्याच्या जीवनाची दोरी असते तोवर त्याने हातात माती घेतली तरी त्याचे सोने होते. पण एकदा का देवाच्या हातून त्याच्या जीवनाची दोरी सुटली की मग सोने जरी हातात घेतले तरी त्याची माती होते. त्याच्या मागची शक्ती, त्याच्या मागचे चैतन्यच ओसरू लागते. पुष्कळ लोक मला सांगतात 'शास्त्रीजी, अमका माणूस फार चांगला आहे, पण त्याचा मुलगा काही तेवढा चांगला नाही.' त्याचे कारण काय? भगवंत स्वतःच त्याला कंटाळून गेलेला असतो. देव म्हणतो, या माणसाच्या पाठीमागे मी उभा राहिलो म्हणून त्याने पुष्कळ पैसा कमावला, पण जे काम करायला हवे होते ते त्याने कधी केले नाही. मग मला त्याच्या घरी राहायचे काय कारण? असा विचार करून देव हळूहळू त्याच्या घरातून निघायला लागतो. एकदा का भगवंत तिथून जायला लागला की त्याच्या मुलांना विपरीत बुद्धी व्हायला लागते. मग लोक विचारतात, 'आमका माणूस तर किती चांगला आहे, पण त्याचा मुलगा विपरीत बुद्धीचा कसा निपजला?' भगवंत म्हणतो, ' तो माणूस सज्जन आहे खरा, पण त्याने असा कोणता वाघ मारला आहे ते तर सांगाल की नाही! ज्याला मी चांगले दिवस दाखवले, चांगली बुद्धी दिली, पुष्कळ कुवत दिली, पण त्याने याचा वापर करून काय दिवे लावले हो!' अशा माणसाला वेळ देऊन देऊन पण चैतन्य शक्ती कंटाळते आणि मग त्याचा रंग उतरूनच जातो. मग त्याने हातात सोने घेतले तरी त्याची माती होते. याचे कारण त्याच्या पाठीशी उभी असलेली शक्ती, चैतन्य शक्ती कमी होऊ लागते. चैतन्य शक्ती त्याला कंटाळते, तिला सुद्धा वाटते की याला किती दिवस असा उडू द्यायचा!
म्हणून आपल्या कर्माची मीजास बाळगू नका. आपल्या पुरुषार्थाची वा बुद्धीची मिजास बाळगू नका. आणि जर मीजास बाळगायचीच असेल तर केवळ भगवत् शक्तीची बाळगा.
अनुकूले जगन्नाथे सानुकूलं जगत् त्रयम्| प्रतिकूले जगन्नाथे प्रतिकूलं जगत् त्रयम्||
जगन्नाथ अनुकूल असला की जग सुद्धा
अनुकूल होते आणि तो प्रतिकूल असला की अख्खे जग प्रतिकूल होते.
हा मजकूर अत्यंत विचारप्रवर्तक आणि आध्यात्मिक अर्थाने समृद्ध आहे. यामध्ये पतंग ही प्रतिकात्मकता वापरून जीवनातील एक मूलभूत सत्य उलगडले आहे—आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हाती असताना आपण यशस्वी होतो, आणि ती दोरी सुटली की आपण दिशाहीन होतो.
मजकुरातील मुख्य विचार:
1. पतंगाचे उदाहरण:
पतंग दोरीने जोडलेला असताना तो आकाशात उंच भरारी घेतो.
पण दोरी सुटली की तो भरकटतो आणि शेवटी निष्प्रभ होतो.
हा उदाहरण जीवनासाठी लागू होतो—जोपर्यंत आपण भगवंताशी जोडलेले असतो, तोपर्यंत आपल्याला यश, आनंद, आणि चैतन्य मिळते.
2. देवाच्या कृपेचे महत्त्व:
जोवर आपली जीवनाची दोरी भगवंताच्या हाती असते, तोपर्यंत आपल्याला यशस्वी बनवण्याची ताकद आपल्याकडे येते.
भगवंत जर नाराज झाला किंवा दूर गेला तर आपल्यातील चैतन्य कमी होते, आणि जीवन दिशाहीन होते.
3. मिजास बाळगू नका:
आपल्याकडे असलेल्या बुद्धी, ताकद, किंवा यश यांचा अहंकार करू नका.
यशासाठी केवळ भगवंताच्या कृपेचीच मिजास बाळगा.
4. श्लोकाचा संदेश:
"जगन्नाथ अनुकूल असला की जग अनुकूल होते, आणि तो प्रतिकूल असला की जग प्रतिकूल होते."
हा विचार आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवाशी जोडलेला आहे. भगवंताच्या अनुकूलतेवरच आपले जीवन अवलंबून आहे.
विचारांची शिकवण:
आपल्या कर्मांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर भगवंताशी सतत जोडलेले राहा.
आपण कितीही यशस्वी असलो तरी त्या यशाचे खरे श्रेय भगवंताच्या कृपेचे आहे, हे लक्षात ठेवा.
जगात कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, भगवंतावर श्रद्धा ठेवली तर सर्वकाही अनुकूल होईल.
हा मजकूर आपल्याला आध्यात्मिक साधनेसाठी प्रेरित करणारा आहे आणि यामध्ये दिलेला संदेश जीवनाला नवी दिशा देणारा आहे.
392 सात 'स' कार दुर्लभ आहेत. ते कोण कोणते?
संपत्ती मिळणे दुर्लभ आहे. याबद्दल सगळ्यांचे एकमत आहे. कारण आपण सर्वजण त्यासाठी धावपळ करत असतो, पण संपत्ती मिळते कुठे सगळ्यांना? जेवढे म्हणून आपण संपत्तीच्या मागे जाऊ तेवढी ती दूर पळते. तिच्या नादी लागलेला माणूस धापा टाकत राहतो.
कदाचित माणसाला संपत्ती लाभते. पण त्यासोबत सरस्वती पाहायला मिळणे हे त्याहूनही दुर्लभ म्हणावे लागले. ज्याच्याकडे संपत्ती असेल त्याच्याकडे सरस्वती मिळणे दुरापास्तच! मला लोक सांगतात ना की, 'शास्त्रीजी! आमची परिस्थिती फार चांगली आहे, पण मुले फारशी शिकली नाहीत. म्हणून म्हणतात की, ज्याच्यापाशी संपत्ती आणि सरस्वती एकत्र नांदत असतील तो माणूस भाग्यवान म्हणायचा. त्याने पूर्वजन्मी पुष्कळ सत्कर्म केलेली असतील असे समजून चला. तो भगवंताचा लाडका मुलगा असेल. त्याचे वर्णन करता येणार नाही.
त्यानंतर जीवनात सत्य असेल आणि संतान असेल तर ती महाभाग्याचीच गोष्ट आणि म्हणून अति कठीण गोष्ट आहे. प्रजा म्हणजे आपली मुले चांगली निपजणे फार कठीण गोष्ट आहे. प्रभू कृपा असली तरच ते शक्य आहे. संतान म्हणजे सम्यक् तनोती तनुविस्तारे| माणसाची जीवन निष्ठा आणि जीवनाचे ध्येय जो वाढवतो, पुढे घेऊन जातो तो संतान. मग तो मुलगाच असेल असे काही नाही. तशी तर गाढविणीला देखील मुले होतात. माणसाच्या जीवनात काहीतरी ध्येय असले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी माणूस जगत असला पाहिजे. पिता आपले ध्येय स्वतःच्या पुत्राला देतो. पुत्राला देण्यासाठी माणसाकडे काहीतरी ध्येय असले पाहिजे. असे आपले शास्त्र सांगते.
मुलाचा पहिला गुरु कोण? माता-पिता हे त्याचे प्रथम गुरु. त्याचा पिता हा आधी गुरु असला पाहिजे. आचार्य वगैरे नंतर, पण आधी वडील हे पहिले गुरु. मग पुढे सांगितले आहे: तदनुग्रह: - सत् म्हणजे सज्जनांचा अनुग्रह घडला पाहिजे. सज्जन व्यक्ती अशी म्हणाली की, हा माणूस मला आवडतो! तर ते जन्म जन्मांतरीचे पुण्य आहे असेच समजले पाहिजे.
हाती सत्ता आली आणि त्याचबरोबर सुकृतसम्भार: घडला, म्हणजे हातून सत्कृत्ये होऊ लागली तर ती ही मोठ्या भाग्याची गोष्ट, अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आणि हे सात 'स' कार जीवनात एकाच वेळी साकार होणं अतिशयच कठीण आहे.
वरील लेखनात उल्लेख केलेल्या सात 'स' कार हे दुर्लभ घटक म्हणजे:
1. संपत्ती (Samruddhi) – संपत्ती मिळणे कठीण आहे आणि ती प्रत्येकाला समान प्रमाणात लाभत नाही.
2. सरस्वती (Saraswati) – ज्ञान, विद्या आणि बुद्धिमत्ता मिळणे दुर्मीळ आहे, विशेषतः संपत्ती आणि सरस्वती एकत्र लाभणे कठीण आहे.
3. सत्य (Satya) – जीवनात सत्यता राखणे किंवा सत्याचा स्वीकार करणे कठीण आहे.
4. संतान (Santaan) – उत्तम आणि आदर्श मुलं लाभणे ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.
5. सज्जनांचा अनुग्रह (Sajjan Anugraha) – सज्जन लोकांची कृपा किंवा सहवास मिळणे.
6. सत्ता (Satta) – योग्य प्रकारे सत्ता, अधिकार किंवा जबाबदारी सांभाळणे.
7. सुकृतसम्भार (Sukrut Sambhar) – सत्कर्मे किंवा चांगली कृत्ये सतत करत राहणे.
हे सात 'स' कार एकाच वेळी जीवनात मिळणे फार दुर्मीळ आणि महान भाग्याची गोष्ट मानली जाते.
Comments
Post a Comment