भगवंताचे व्हायचं.


        
या जगतात मुंगी पासून प्रत्येक जीव मरतात तेव्हा भगवंताच्या दारीच जातात, पण प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते. जात्यावेळी त्यांची भावना, त्यांची विचारसरणी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांचे अंतरातली आतुरता, ओढ वेगळी वेगळी असते.
     
जसे आपण मरायला तयार नाहीत तसे तुकाराम महाराजही मारायला तयार नव्हते. ते देखील जीवन मागत होते:
 
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी|
 घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझीही चरण सेवा साधावया||
  
'भगवंता| मला जन्म पाहिजे मी सुखाने गर्भवास स्वीकारण्यास तयार आहे. तुझ्या चरण सेवेसाठी जन्म घेण्यास तयार आहे.' भक्तांची मागणी आहे की आम्हाला 'भगवंत' व्हायचं नाही, आम्हाला 'भगवंताचे' व्हायचं आहे. भगवंताचे होण्यात जो आनंद आहे तो 'भगवंत' होण्यात नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन