निजधामास जाणे
आकर्षण माहेरचं
ज्यानी हा माझा आत्मा आहे अशी समज म्हणजे ज्ञानी, म्हणजे 'मीच'.
कर्मयोग्यासाठी मरण म्हणजे विश्रांती होय. पन्नाससाठ वर्षे काम करून थकल्यावर माणसाला विश्रांती पाहिजे. त्यासाठी आईच्या घरी जायचे. भक्त आणि ज्ञानी मेल्यावर स्वतःच्या घरी जातात, त्याला निजधामी गेले असे म्हणतात. पण कर्मयोगी जीव माहेरी आईला भेटायला, विश्रांती घ्यायला जातो. आईचे घर हे स्वतःचे घर नाही. कर्मयोगी जीवाला माहेराचे, भगवंताचे आकर्षण आहे म्हणून त्याच्यासाठी मृत्यू म्हणजे विश्रांती घेण्यास जाण्यासारखे आहे.
दोन सामान्य स्त्रिया एकाच गावी जाण्यासाठी बरोबर निघाल्या होत्या. एक माहेराहून सासरी जायला निघाली होती आणि दुसरी सासरहून माहेरी जात होती. माहेराहून सासरी जाणारी जी होती तिचे डोळे पाण्याने भरलेले होते; तिचे पाय जड झाले होते. पण सासरहून माहेरी निघालेली स्री वेगाने चालत होती. दोघी एकाच गावी प्रवेश करत होत्या, दोघी बरोबरच चालत होत्या. दोघींचे सामानही सारखेच होते. पण दोघींच्या चालण्यात फरक आहे; दोघींच्या भावनेत फरक आहे.
सामान्य जीव हिशोब देण्यासाठी जातो म्हणून त्याचे पाय जड असतात.
Comments
Post a Comment