अंतिम स्थान भगवंत
विद्वान व अविद्वान या दोघांचे मरण सारखेच आहे. मेल्यावर दोघे एकाच ठिकाणी जातात. दोघेही भगवंतापाशी जातात यात शंकाच नाही. परंतु कोणत्या रूपात जातात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
या जगात हरामखोरातील हरामखोर आणि भगवंताचा निस्सीम भक्त दोघेही भगवंता पाशी जाणार आहेत. पण कोणत्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. जीवनाकडे बघण्याची ज्याची जशी दृष्टी असेल तशी त्याची गती असेल. अन्ते या मति सा गति| अंते म्हणजे अंतिम क्षणी, देहातून शेवटचा श्वास निघतो त्यावेळी भगवंताचे स्मरण झाले तर तशी गती मिळते. म्हणूनच तर अजामिळाने त्याच्या मुलाचे नाव 'नारायण' ठेवले होते. ही कथा आहे फार रोचक. तशीच ती गोष्ट माणसाला भक्ती कडे वळवते म्हणून Discard करण्यासारखे देखील नाही. परंतु हा काही वैश्विक सिद्धांत नाही.
मुद्द्याची गोष्ट अशी आहे की जो हरामखोरीचे जीवन जगलेला असतो त्याच्या तोंडून शेवटच्या घडीला नारायणाचे नाव निघेलच कुठून? लोकांना माहित आहे की शेवटच्या घडीला भगवंत आठवतच नाही. म्हणून मुलासाठी आसक्ती आहे तर मुलाचे नाव 'नारायण' ठेवतात. म्हणजे ते नाव आठवल्यामुळे चटकन मुक्ती मिळून जाईल! पण खरे तर मुक्ती अशी सरळपणे मिळाली असती तर योग, याग, उपनिषद् स्मरन् मुक्त्वा कलेवरम्|
अंतकालापर्यंत जीवनाकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन असेल, भले भौतिक दृष्टिकोनही असेल तरीही जीवनाच्या शेवटच्या क्षणी असा एखादा पारसमणी मिळाला आणि दृष्टी बदलली तर गती बदलूनही जाते.
Comments
Post a Comment