न लगे मुक्ती धनसंपदा
श्रुतीने विद्वान-अविद्वानाचे चर्चा मृत्यूच्या संदर्भात केली आहे कारण त्यात समग्र जीवनाचा दृष्टिकोन सामावला आहे. मृत्यूची समस्या ही जीवनाच्या दृष्टिकोनावर आधारित आहे.
विद्वानाला जीवनाची आकांक्षा आहे, त्याला जीवणाची अभिलाषा आहे कारण प्रभू माझ्याबरोबर आहे, माझ्याबरोबर खेळतो आहे ही त्याची समज आहे. या देहातच त्यांना ईशतत्व दिसते. भगवद् तत्वाची अनुभूती येते. त्यातूनच त्यांना भगवंताचे प्रेम अनुभवायला येते. या देहाद्वारे भगवंताचे काम होते म्हणून त्यांना द्वैत हवे असते, अद्वैत नको असते.
न लगे मुक्ती धनसंपदा- त्यांना देखील नको असते. भगवान त्यांच्यासोबतच आहे, हा विचार त्यांच्या समग्र व्यवहाराच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे त्यांचे भगवंतावरील प्रीती वाढलेली असते.
सामान्य माणसाचे जिवावर जीवनावर प्रेम नसते. त्याला जीवनाचे आकर्षण असते. हे लोक जीवनापासून वेगळे असतात. आकर्षण नेहमी दुसऱ्यासाठी असते, दुसऱ्या वस्तूसाठी असते. घड्याळ आणि मी वेगवेगळे आहोत म्हणून घड्याळ मला आकर्षित करते. वाल्मीकि, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, पतंजली या सर्वांच्या जीवनाविषयी ऐकल्यावर श्रोत्यांना आकर्षण वाटते की, 'ओहो! हो! केवढे भव्य जीवन आहे त्यांचे! या आकर्षणात द्वैत आहे, वेगळेपण आहे. अशाच प्रकारे सामान्यांना आयुष्यभर जीवनाचे आकर्षण असते. परिणामी त्यांना जीवन जगायला मिळत नाही.
Comments
Post a Comment