दत्त जयंती - दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या महानकार्याचे प्रतीक आहे.

         
उपनिषदात म्हटले आहे, 'मातृवान, पितृवान, आचार्यवान् पुरुष वेद|' ज्याला योग्य आई बाप आणि गुरु मिळतात त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. हे सद्भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते. अशापैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रेय. अत्रि ऋषी व महासती अनुसया यांचे ते सुपुत्र. 'अत्रि' म्हणजे त्रिगुणातीत आणि 'अनुसया' म्हणजे असुया रहित. सत्व, रज, व तम या तीन गुणात रममान न होता तिने गुणांना जो स्वेच्छेने खेळू शकतो तो अत्री आणि स्री सुलभ असलेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिलेला नाही अशा प्रकारचा जिवंत मन मोकळेपणा म्हणजे अनुसया. अशा आई - बापाच्या कुशीत दत्तासारखा तेजस्वी पुत्र अवतारतो.
     
पुराणात कथा आहे, ब्रह्म - विष्णू - महेश हे महासती अनुसयाच्या सतीत्वाची कसोटी पाहायला अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी अनुसयाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला सांगितले .पतीव्रता स्रीला हे फार कठीण होते आणि भिक्षा दिली नाही तर अतिथी सत्कारात उणेपणा राहिला असता. महासती अनुसयाने स्वतःचे तप व सतीत्वाचा प्रभाव यांच्या बळावर तीनही देवांना लहान बालके बनवली आणि त्या अडचणीतून मार्ग काढला. देवलजीत झाले. देव पत्नी यांच्या विनवणी वरून अनुसयाने त्यांचे पती त्यांना मूळ स्वरूपात परत केले. जाता जाता देवांनी आशीर्वाद दिला की तू आम्हाला बाल स्वरूप दिलेस. तू आमची आई बनलीस. आता आम्ही तिघेही संयुक्त - रीत्या तुझ्या कुशीत जन्म घेऊ. देवांच्या या आशीर्वादाने त्यांच्या संयुक्त अंश रूपात जन्मलेले बालक म्हणजेच दत्त.
     
उपरोक्त प्रसंगातील पौराणिकता वजा केली तर ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्यासारख्या तीन प्रभावी शक्ती, बाल सहज कुतूहलाने अत्रि व अनुसयाच्या आश्रमात चालत असलेली अविरत कर्म योग्याची धारा पाहण्यासाठी आल्या होत्या. आनंद व उत्साहाने अतिशय मोकळ्या मनाने त्यांना आश्रमाची कार्य परंपरा दाखविली. ते सर्व पाहून आश्चर्यचकित व प्रभावित झालेल्या देवांनी तेथेच राहायचे निश्चित केले. हेच कार्य महान आहे व स्वतःच्या शक्तीचा अंश याच्यातच खर्च केला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांच्या या भावनांचे जिवंत स्वरूप म्हणजे दत्त. शिवाय याप्रमाणे समाजात प्रभू कार्य करू इच्छिणाऱ्याला समाजाच्या संपूर्ण परिस्थितीची किंवा समस्यांचे स्पष्ट ज्ञान असले पाहिजे. त्याच्या दृष्टीने काही लपलेले असता कामा नये. ईश कृपेने प्राप्त झालेल्या या बालकाला अत्रि ऋषींनी प्रभू कार्यार्थ अर्पण केले. सांस्कृतिक कार्याला दिलेले, म्हणून त्यांचे नाव दत्त पडले. अत्रीचा पुत्र म्हणून तो अत्रेय. हे दोन्ही शब्द जोडून त्याला दत्तात्रेय म्हणून लागले. दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या महानकार्याचे प्रतीक आहे. कोणत्याही महान कार्याला साकार करण्याची तळमळीची इच्छा बाळगणाऱ्या कर्मवीरा जवळ ब्रह्मा, विष्णू व महेश यांची सर्जक, पोषक तसेच संहारक प्रतिभा असली पाहिजे. नित्यनूतन शक्ती, संपत्ती किंवा सद् विचार यांचा अविरत प्रवाह कार्यात वाहत राहिला नाही तर कार्याचे उत्कृष्ट सर्जन झाले असे मानले जात नाही. नवे नवे विचार आणि प्रेरणा देण्याची तसेच नवे नवे प्रयोग करण्याची आगळी सर्जनात्मक प्रतिमा कार्यप्रमुखाजवळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे कार्याचे नित्य पोषण होत रहावे यासाठी कार्यरत झालेल्या लोकांवर प्रेमाची पकड बसवणाऱ्या विष्णूचा प्रेम प्रवाह देखील त्याच्याजवळ वाहता असला पाहिजे. विसर्जन व सर्जन मिळूनच श्रेष्ठ नवसर्जन होते. या दृष्टीने पाहता शंकराची संवाद शक्ती देखील त्याने आत्मसात केली पाहिजे. श्रेष्ठ विचारांचे सर्जन, सदभक्तीचे पोषण आणि दुर्गुण, दुर्वती व दुर्विचार यांचा संवाद करण्याची त्रिमुखी प्रतिभा ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक बनू शकतो.
     
दत्तात्रेयाच्या हातात कमांडलू, माळा, शंख,चक्र, त्रीसूळ व डमरू आहे. हे सहा प्रतीके देखील विशिष्ट अर्थाची सूचक आहेत कमंडलू व माळा ब्रह्माचे आहेत. शंख व चक्र विष्णूचे आहे. तर त्रिशूल व डमरू भगवान शंकराचे आहेत.
    
ब्रह्मा हा निर्माता देव आहे. त्याच्या हातात कमंडलू व माळ आहे. कमंडलू मध्ये पाणी असते. पाणी म्हणजे जीवन, अशा दृष्टीने पाहता, आपले प्रत्येक सर्जन प्राणवान झाले पाहिजे; मग ते मानव सर्जन असो, शिल्प सर्जन असो, चित्रकला असो, नृत्य कला असो, संगीत गायन असो किंवा साहित्य कृती असो.
    
कोणतीही निर्मिती प्राणवाण केव्हा होते? जेव्हा तिच्या पाठीमागे भक्ती असते तेव्हा. माळ हे भक्तीचे प्रतीक आहे. कोणतीही कला भगवंताच्या चरणावर अर्पण झाली की, तिचा रंगच बदलून जातो. तर तिची प्रतिमा सोळा कलांनी फुलून उठते. कदाचित हीच गोष्ट लक्षात ठेवून भारतातील सर्वच कला मंदिरात म्हणजे भगवंताच्या चरण कमला जवळ विकास पावलेल्या आहेत. तुम्हाला भारतातील उत्कृष्ट शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला किंवा संगीत प्रवीणता पाहायचे असेल तर भारतातील मंदिरांचीच मुलाखत घ्यावे लागेल.
     
विष्णू ही पोषण करणारी पालक देवता आहे. तिच्या हातात शंख व चक्र आहेत. शंख ध्वनी प्रेरक आहे आणि चक्र गती सूचक आहे. कार्याचे पालन करू इच्छिणारा कार्यप्रमुख समग्र कार्यक्षेत्रात चक्रा प्रमाणे फिरता असला पाहिजे. असाच शंका प्रमाणे तेजस्वी विचारांचा उदघोष करून त्याने अन्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला पाहिजे.
    
शंकर हा संहार देव आहे. त्याच्या हातात त्रिशुल व डमरू आहे. त्रिशूल हे संहाराचे प्रतीक आहे तर डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. संहार व संगीत स्वतः बरोबर बाळगणारा हा देव, महादेव गणला जातो. संहार किंवा मृत्यूची काही भयंकर घटना नाही हे समजण्यासाठी भगवान शंकर स्मशानात राहतात. मृत्यू म्हणजे जीवाचे शिवाला भेटायला जाणे. भगवान शंकर डमरू हातात घेऊन संगीतासह सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभे असतात. विसर्जन एक महान संस्था आहे. तिचे कार्य देखील महान आहे. जुने जाणे व नवे निर्माण होणे हीच संसारात असलेले प्रवाह- नित्यता आहे.
     
अशा प्रकारची आगळी प्रतिमा असलेल्या दत्तांनी स्वतःच्या जीवनात अनेक लोकांना गुरु समजून त्यांचे गुण घेतले आहेत. ही त्यांची अतुलनीय नम्रता आहे. स्वमताग्रहा ऐवजी गुणग्राही बनलेला माणूस अनेक लोकांच्या अनुभवांना आत्मसात करून महान कार्य उभा करू शकतो, हे दत्त आपल्या आचरणाने समजावत आहेत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन