सृष्टीची रहस्य शोधून काढली

शुद्ध चैतन्याने जीव निर्माण केला. जिवाच्या आनंदासाठी, त्याला खेळण्यासाठी त्याने वेगवेगळ्या शक्ती सृष्टीत भरल्या, जीवाला बुद्धी शक्ती देऊन म्हटले, 'तू सृष्टीची रहस्य शोधून काढ आणि तुझा निर्वाह कर.' म्हणून ही शक्ती जीवाची नाही, ईश्वराची आहे.

मुलाची बुद्धी विकसित व्हावी म्हणून माता वेगवेगळ्या युक्त्या योजते. एका आईने मला सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. हापूस आंब्याचा सीजन होता. तेव्हा मुलांनी आईकडे अंबा मागीतला. आई म्हणाली, 'मी आंबे लपून ठेवले आहेत. तू शोधून काढ अन खा.' संपूर्ण दिवस त्याने आंबे शोधायला मेहनत केली आणि शेवटी कोळशाच्या पिंपावर बसला. पिंपाचे झाकण दबले गेले, त्यातून डब असा आवाज आला आणि त्याने सहज जिज्ञासेने ते झाकण उघडले. कोळसे होते ते जरा बाजूला सारले तर त्याच्या खालून आंबे निघाले. मुलगा आंबे सापडल्याने हरकून गेला‌. त्याला आंबे खायला मिळाले.
     
त्याप्रमाणे ह्या सृष्टीच्या शक्ती जगदंबेने- जगदीशाने लपवून ठेवल्य आहेत आणि मुलांना सांगितले, 'त्या शोधून काढून उपभोग आणि आनंद द्या.' परंतु मुलांनी जेव्हा आळशी बनून शोधायचं बंद केलं तेव्हा भगवंताने लहान मुलांच्या कानात फुंकर घालून संकेत दिला. असे शोधाच्या पाठचा इतिहास सांगतो. सृष्टीने स्वतःचे दरवाजे उघडून दाखवले, 'बाळ, जरा पहा तर खरे हे काय आहे?' सगळे शोध लागले तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या शाळा, कॉलेजे किंवा प्रयोगशाळा नव्हत्या  त्यांना हा विचार प्रभू कृपेने आला. ते शोध प्रभू कृपेने लागले असे माझे स्पष्ट म्हणणे आहे.
    
 शोध वैज्ञानिकांच्या मेहनतीने आणि पुरुषार्थाने लागले आहेत असे केव्हा म्हणू शकतो? त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळा वापरल्या असत्या, त्याबद्दलचे शिक्षण घेतलेले असते, त्या प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केलेला असता तर त्याचे श्रेय वैज्ञानिकांना जरूर द्या.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन