लोकवत्तु लीलाकैवल्यम्


          
     
सृष्टीकर्त्याचे हेच वैचित्र्य आहे. त्याने भेद निर्माण केला आहे. लोकवत्तु लीलाकैवल्यम्| भेदाशिवाय लीला संभवू शकत नाही. फूल नाकापासून निराळे आहे म्हणून फूलाचा सुगंध अनुभवता येतो. भूक पोटात आहे आणि गहू पोटापासून दूर शेतात आहेत म्हणूनच ते खाण्याचा आनंद आहे. भेदात आनंद आहे, ही एक मोठी तात्विक विचक्षणा आहे. पण ती जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर त्यातील मर्म ताबडतोब ध्यानात येईल.
     
मी तुम्हाला तुमचा दृष्टांत देतो. रात्री बारा वाजता तुम्ही झोपता तेव्हा तुमचे अस्तित्व होते की नव्हते? माणसाला उठावेसे वाटते कारण जागृती मध्ये खेळायचे असते, झोपेत खेळायचे नसते.
    
झोप ही घटना दृष्टांत म्हणून समजून घ्यायची तर तिथे अभेद आहे. तिथे खेळणे नाही. मला खेळायचे आहे म्हणून मी उठतो. याप्रमाणे भगवंताचे अस्तित्व अभेदात आहे, आणि भगवंताचे खेळणे भेदामध्ये आहे. म्हणून खेळण्यासाठी लोकवत्तू लीलाकैवल्यम बहु स्याम् प्रजायेयेति - 'मी अनेक व्हावे' अशी त्याला इच्छा झाली.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.