भगवंताला जीवनातून वजा करून जीवन निरांदी होईल.
आनंदमयता हा परब्रम्हाचा शारीर आत्मा आहे. जो चोवीस तास तुष्यन्ति च रमन्ति च आहे. म्हणजे आनंदमय आहे त्याला सतत आत्मतत्त्वाचे प्रस्फुरण असते. आनंदमयतेचे वर्णन करताना ऋषी सांगतात, असत् एव स भवति| भगवंताला जीवनातून वजा करून जीवन आनंदमय होणे शक्य नाही. काही जण कदाचित् म्हणत असतील की, 'आम्हाला भगवंताची गरज नाही, आम्ही सुखीच आहोत.' दुनियेला दाखवायला ते सुखी असतील पण आतील आत्मा तर त्यांना डंख मारत असतो. त्यांना वाटत असतेच की जीवनात काहीतरी उणीव आहे, कुठेतरी गफलत होते आहे. त्यांच्या मनात पोकळी असते. मग ती भरून काढण्यासाठी कोणी कीर्तनाच्या नादी तर कोणी क्लबच्या नादी लागतात. कारण ते स्वतःला विसरायला बघत असतात. म्हणून माणूस सर्वत्र जी धावपळ करतो ते स्वतःला विसरून जाण्याच्या इच्छेने करतो. त्याच्या जीवनात तो पळवाट शोधत असतो आणि त्यासाठी त्याचे सर्व प्रयत्न सुरू असतात. ज्याप्रमाणे सतत मृत्यूला बरोबर घेऊन फिरणारे सैनिक त्याला विसरण्यासाठी दारू पीत असतात.
सृष्टीला आनंदमय बनवायचे असेल तर सर्वप्रथम सृष्टीमध्ये ईश्वराला घेऊन जा. अर्थात सृष्टीत तर ईश्वर आहेच, पण लोक ते विसरले आहेत.
Comments
Post a Comment