वैचारिक आनंद


                
    
 जसा अध्यात्मिक आनंदा आणि निद्रेचा आनंद सारखा असतो तसा वैचारिक आनंदही सारखाच असतो. त्यात काडी मात्र ही फरक नसतो. भगवंताने संपूर्ण सृष्टी आनंदमय बनवली असूनही माणूस निरानंदी आहे, हे खरोखरच आश्चर्य आहे.
    
लोक आपल्याला रडवतात आणि आपण वेड्यासारख्या रडत बसतो. कोणी येऊन मला विचारले की, 'काय, इतकी वर्ष झाली मुंबईत राहून. एखादे घर तरी बांधले नाही? आणि मी म्हटले, 'नाही' तर म्हणतील की, 'एवढी वर्ष मुंबईत राहून फायदा काय?' तेव्हा मलाही वाटते की गोष्ट तर खरी आहे. त्यामुळे मी दुःखी होतो. पण एखादा असे विचारेल की असे फाउंटन पेन तुमच्याकडे नाही आणि मला वाटते अशी एखादे पेन आपल्याकडे असले पाहिजे. अशी प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की, वृथा गतं तस्य नरस्य जीवितम् - माझे जीवन फुकट गेले. अशावेळी मला विचार केला पाहिजे की माझ्यापाशी काय आहे आणि काय असले पाहिजे, हे नक्की करणारा तू कोण? त्याच्यापेक्षा मी विशेष आनंदी आहे असे मला वाटले पाहिजे.
    
भगवंताची भीती आणि त्याच्यावरील अविश्वासामुळे माणूस जीवनाचा आनंद हरवून बसला आहे. जीवन निरानंदी बनले आहे‌. पण लोक त्याचे समर्थन करताना म्हणतात, 'भगवंताची भीती ही शहाणपणाची सुरुवात म्हटली जाते.' हा युक्तिवाद खरा आहे. पण यात समजदारीचा अभाव आहे. भगवंताची भीती वाटण्याची गोष्ट अगदी प्राथमिक अवस्थेपूर्ती बरोबरही आहे. वस्तूतः आपण काही चुकीचे केले असले तर भगवंताच्या शिक्षेचे भय वाटेल, पण चूक केलीच नसली तर त्याची भीती वाटण्याचे काय कारण? आणि घटकाभर असे मानले की आपल्याकडून काही चूक झाली असेलही तर भगवंत आपला पिता आहे. तो शिक्षा करून करून अशी कितीशी करेल? जशी आईकडून होणारी शिक्षा ही चोराला सरकार सजा ठोठावते तशी नसते, मग भगवंत तर जगाचा पिता आहे, जगदंबा आहे. कदाचित उलटे सुलटे झाले तर भगवंत थोडी शिक्षा करेलही. पण ती शिक्षा आईने केलेल्या शिक्षेप्रमाणे असेल. परंतु आपण भगवंताच्या अशा काहीशा भीतीमुळे आपले जीवन निरानंदी बनवले आहे.
     
भगवंतावरच्या अविश्वासामुळे देखील आपले जीवन निरानंदी झाले आहे, हे दुसरे कारण आहे. भगवंतावरच्या अविश्वासामुळे माणूस व्यर्थ दुखी होतो. 'माझे काय होईल? असा विचार करत माणूस विश्वास गमावून बसतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन