माणसाचा भगवंतावर विश्वास नाही.


   माणसाचा भगवंतावर विश्वास नाही.
    
म्हणून तर वेदांमध्ये ऋषींनी म्हटले आहे. भगवंता अवघे विश्व भद्र आहे, कल्याणकारक आहे कारण देव त्याचे रक्षण करीत आहेत. जर ते अभद्र असते तर देवाने त्याचे रक्षण कशाला केले असते?
    
 समग्र सृष्टीत पशु, पक्षी सर्वांमध्येच आनंदमयता आहे. केवळ मनुष्य की जी भगवंताची फर्स्ट क्लास कृती आहे तीच निरानंदी, दुखी आहे! त्यामुळे जीवशास्त्राचा अभ्यास केला तर आपण थर्ड क्लास मध्ये तरी येऊ की नाही याची शंका आहे.
    
 माणूस केवळ एका गोष्टीसाठी बढाया मारू शकतो की सृष्टीचे सौंदर्य अनुभवण्यासाठी भगवंताला माणसाचाच आकार घ्यावा लागला. माझ्यासारखाच भगवंत आहे हे म्हणण्या पलीकडं माणसापाशी दुसरे आहे तरी काय? माणसात भगवंतासाठी ना श्रद्धा ना निष्ठा .
      
 माणसापेक्षा बैलाचा भगवंतावर जास्त विश्वास आहे. बैल गवत खाऊन सुखाने झोपतो. त्याला खात्री आहे की उद्या सुद्धा भगवान त्याला हिरवा चारा देईल. माणसाला अशी खात्री आहे? म्हणून तर केवळ भविष्यकाळाचीच नाही तर जन्मभर पुरेल एवढी पुंजी तो भरून ठेवतो. एवढेच नव्हे तर मुलांसाठी, नातवंडांसाठी ही गोळा करून ठेवतो! त्याची ही संग्रहखोरी अखंड चालूच असते. याचे कारण माणसाचा भगवंतावर विश्वास नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन