नैराश्य

  
तुमची तुमच्या स्वतःवर श्रद्धा तुम्ही उभी करावी यासाठी स्वतःवर दोष लादून घेणारे ऋषी महान की तुम्ही क्षुद्र आहात हलके आहात पापी आहात, तू माझ्याकडे येशील तरच तुझा उद्धार होईल असे सांगून स्वतःचे महत्त्व वाढवणारे आजचे तथाकथित गुरु महान?
     
आज माणसाची जीवनावरील श्रद्धा उडून गेली आहे. आज घराघरात श्रद्धाशून्य माणसे राहतात. 'माझे काय होईल? भाकरी मिळेल की नाही?' हे त्यांचे बोल आहेत. हताशेने भरलेले सर्वांचे जीवन झाले आहे. 'माझे भविष्य मी निर्माण करेन. मी भगवंतापर्यंत पोहोचेन.' असे म्हणणारा शोधून सापडत नाही.
     
आज पुष्कळ पुस्तके छापली जातात. विद्वान मोठमोठे ग्रंथ लिहितात. परंतु एकाही पुस्तकात असे लेखन आहे की ते वाचून माणसाच्या मनात आत्मश्रद्धा उभी राहील?आज कोणालाही जीवन जगण्यासारखे वाटतच नाही. 'भगवान मिळविनच' अशी श्रद्धा तर माणसापाशी नाहीच पण 'माझी भाकरी मी मिळवू शकेन' एवढी श्रद्धा ही नाही  सर्व 'म्हातारे' झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.