ऋषींनी पण स्वतःच्या नावाने अशी पातके लीहून ठेवली आहेत.

     
खलील जिब्रानची एक सुंदर गोष्ट आहे. एक साधू एका डोंगरावर बसला होता. तेव्हा एक दिन दुबळा माणूस काठी टेकत त्याच्यापाशी आला. जीवनात हरलेला तो माणूस म्हणाला, 'महाराज! मी पापी आहे, मला वाचवा.' साधू म्हणाला, 'पण मी तर तुझ्याहून जास्त पापी आहे.' तेव्हा तो म्हणाला, 'महाराज! तुम्हाला माहित नाही मी केवढा पापी आहे. मी किती पापे केली आहेत, किती चोऱ्या केल्या, दारू प्यायलो, व्यभिचार केला‌. मी महान पातकी आहे.'
     
साधू म्हणाला, 'हे सर्व तर मी पण करून चुकलो आहे. या सर्व गोष्टीत मी तुझ्यापेक्षा सवाई शोभतो असे समज.
    
' पण प्रभू! मी माझ्या स्वार्थाकर्ता कित्येकांच्या माना कापल्या आहेत, डोकी उडवली आहेत.'
    
'हा तर तू माझाच अनुभव सांगतो आहेस असे वाटते.' हे साधूचे बोलणे ऐकून त्या माणसाने साधूकडे नीट पाहिले. त्याच्या डोळ्यात दिनता होती की निघून गेली. लंगडत आला होता तो छातीवर काढून परत निघाला.
     
साधूपाशी त्याचा एक भक्त बसला होता, त्याने नंतर म्हटले, 'महाराज! तुमच्या जीवनाला तर पापाचा स्पर्शही झालेला नाही. तुम्ही कोणतेही दुष्कृत्य केलेले नाही. तर मग तुम्ही असे खोटे का बोललात? तो माणूस केवढ्या श्रद्धेने तुमच्याकडे आला होता. त्याची तुमच्यावरील श्रद्धा तुम्ही उडवून लावलीत.'
    
साधू म्हणाला, 'तुझे म्हणणे बरोबर आहे. माझ्यावरील त्याची श्रद्धा उडाली असेल पण विश्वास ठेव की त्याची स्वतःवर श्रद्धा बसली असेल. त्याला असे वाटले असेल की असा पातकी देखील साधू बनू शकतो तर मी का नाही बनू शकणार? मी पण साधू बनू शकतो, म्हणून तर जो काठी टेकत चालत आला होता तो छाती फुगवून परत गेला‌. त्याच्या डोळ्यात लाचारी होती तीही नाहीशी झाली.'
     
आपल्या ऋषींनी पण स्वतःच्या नावाने अशी पातके लीहून ठेवली आहेत. पराशर, वेदव्यास इत्यादींनी लिहून ठेवले आहे की आमके पातक मी केले आहे. परंतु माझी खात्रीच आहे की त्यांनी असले कोणतेही पातक केलेले नाही. अरे, ज्यांनी आत्मानुभूती घेतली आहे, पूर्णतेच्या अनुभूतीचा आनंद अनुभवला आहे, ज्यांना व्यावहारिक सुखोपभोगही तुच्छ वाटले आहेत ते जीवनात उलटे-सुलटे करूच कसे शकतील? पण पराशरांनी एवढ्यासाठीच लिहिले असेल की कदाचित् त्यांच्यावर श्रद्धा नष्ट झाली तरी हरकत नाही, पण तुमची स्वतःवर श्रद्धा बसेल की पराशर असे होते तरी भगवंताचे लाडके बनू शकले मग मी का नाही बनणार?
  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन