भक्ती करण्याचा दृढनिश्चय
भक्ती करण्याचा दृढनिश्चय केलेला
भगवंतावर अशाप्रकारची श्रद्धा असली पाहिजे की तो पतीतपावन आहे, दयाळू आहे, तो अतिप्रेमळ आहे, त्याच्या पाया पडा पण ते भीतीने नाहीतर श्रद्धेने पाया पडा परंतु भगवंतानेच गीतेत म्हटले आहे: अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक|
साधूरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:||
अंत्यत दुराचारी सुद्धा अनन्यभावाने माझी भक्ती करेल तर त्याला उत्तम स्वभावाचा साधू पुरुष मानावा. कारण त्याने माझी भक्ती करण्याचा दृढनिश्चय केलेला असतो.
वास्तविक माणूस स्वतःचे नातेवाईक, शेजारी, भागीदार वगैरे सबंधी श्रद्धा हरवून बसलेला असतो. त्यामुळे स्वतःवरील श्रद्धाही गमावून बसतो आणि दुःखी झालेला असा जीव भगवंतावरही श्रद्धा ठेवू शकत नाही.
ज्याच्या जीवनातून स्वतःवरील श्रद्धा आहे आणि ती कशी वाढेल, कशी दैवी बनेल, दिव्य बनेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आज सर्वजण आत्मश्रद्धाशून्य बनले आहेत आणि वर बोलत राहतात, 'हे कलियुग आहे, यात भर म्हणजे भगवंताचे काही चालणार नाही'.
Comments
Post a Comment