दिवाळी
दिवाळी
दिवाळी म्हणजे वैशांचा व या पूजनाचा दिवस. संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस. ह्या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग द्वेष, वैर, जहर, ईर्षा, मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साहा वाढावा याकडे लक्ष दिले पाहिजे.
नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात. तेजस्वी वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्ण आश्रम व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या बलिचा वामनाने पराभव केला. त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदेचा उत्सव साजरा होऊ लागला. बलिदान शूर होता. त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात असलेले शिवभक्त व पाहण्याचे दृष्टी देते. कनक व कांता यांच्या मोहात अंद बनतो. म्हणून माणूस असुर बनतो. म्हणून बलिचा पराभव करणाऱ्या विष्णूने कणक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून तीन दिवसाचा उत्सव करण्याचा आदेश दिला. दिवाळीच्या दिवशी कनक म्हणजे लक्ष्मीकडे पाहण्याचे पूज्यदृष्टी जोपासण्याचे शिक्षण व भाऊबीजेच्या दिवशी समस्त श्री जातीकडे आई किंवा बहिण ह्या दृष्टीने पाहायचे शिक्षण घ्यायचे. श्री ही भौग्य नाही. तशी त्याज्य देखील नाही ती पूजा आहे ही मातृदृष्टी देणारी संस्कृतीच मानवाला विकारासमोर स्थिर राहण्याची शक्ती देऊ शकते. मोह म्हणजे अंधकार. दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाडा आकारातून ज्ञान प्रकाशाकडे प्रायान!
दिवाळी म्हणजे दीपोत्सव. बाहेर तर दिवे पेटवायचेच पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पण त्या निरर्थक आहेत. देवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे. धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमात, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नारकासुरांना मारणे. दिवाळीच्या दिवशी 'तमसो मा ज्योतिर्गमय' मंत्राची साधना करता करता जीवनपट प्रकाशित करायचा. जीवनाच्या वहीचा आढावा घेतेवेळी जमिनीच्या बाजूला इस कृपा राहावी यासाठी प्रभू कार्याच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे.
नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर वीस विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे. नव्हे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस. भाऊ विजेच्या दिवशी श्री कडे पाहणाऱ्या भद्रदृष्टीची शिकवण घ्यायचे आणि बंधूंच्या निर्यात प्रेमाने संपूर्ण श्री समाज बहिणीच्या रूपात स्वीकारायचा. सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर आपल्या जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव समान बनेल.
Comments
Post a Comment