विजयादशमी
विजयादशमी
'यात्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:| तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मम||'
जेथे योगेश्वर कृष्ण आहे, धनुर्धर पार्थ आहे तेथेच विजय आहे. लक्ष्मी आहे, कल्याण आहे आणि शाश्वत शांती आहे असे माझे मत आहे; असे संजयने गीतेच्या अंतिम श्लोकात म्हटले आहे.
योगेश्वर कृष्ण म्हणजे ईशकृपा, आणि धनुर दर पार्थ म्हणजे मानव प्रयत्न या दोघांचा जेथे संगम होतो तेथे काय असंभव आहे? वाढता मानव प्रयत्न आणि अवतरत्या कृपेच्या जेथे मिलन होते तेथे विजयाचाच घंटानात संभवतो ही निर्विवाद घटना आहे. दसऱ्याचा उत्सव म्हणजे भक्ती व शक्ती यांचा समन्वय समजावणारा उत्सव. नवरात्राचे नऊ दिवस जगदंबेचे उपासना करून शक्ती प्राप्त केलेला मनुष्य विजयप्राप्तीसाठी येथे नाचू लागणे अगदी स्वाभाविक आहे. ह्या दृष्टीने पाहता दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजय प्रस्तावनाचा उत्सव.
भारतीय संस्कृती वीरतेचे पूजक आहे. शौर्याचे उपासक आहे. व्यक्ति व समाज यांच्या रक्तात वीरता प्रगटावी ह्यासाठी दसऱ्याचा उत्सव आहे. जर युद्ध अनिवार्य असेल तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणे ही कुशल राजनीती आहे. शत्रुने आपल्या राज्यात घुसून लोटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाईची तयारी करणे एवढे आपले पूर्वज नादान नव्हते ते तर शत्रूचा दूर व्यवहार करतात त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत. रोग व शत्रू यांना उत्पन्न होतात दाबले पाहिजे. एकदा जर त्याचे पाय पसरले गेले तर मग त्याच्यावर ताबा मिळविणे मुश्किल बनते.
प्रभू रामचंद्राच्या वेळेपासून हा दिवस विजय प्रस्थानाचे प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्र आणि रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले होते. छत्रपती शिवाजीने ही औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी त्याच दिवशी प्रस्थान करून हिंदू धर्माचे रक्षण केले होते. आपल्या इतिहासात असे अनेक उदाहरणे आहेत की, हिंदू राजे ह्या दिवशी विजय प्रस्थान करीत होते.
पावसाच्या कृपेने मानव धन्याने समृद्ध झालेला असतो, त्याच्या मनात आनंद मावत नसतो, नसानसात उत्साहाचे कारंजी उसळत असतात अशावेळी त्याला विजय प्रस्थान करावे असे वाटते हे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरील चिखल वाळलेला असतो. हवामान अनुकूल असते, आकाश स्वच्छ असते. असे वातावरण युद्धाला अनुकूलता प्राप्त करणे करून देणाऱ्या असते. नऊ नऊ दिवस जगदंबेचे उपासना करून प्राप्त केलेली शक्ती ही शत्रूचा संहार करायला प्रेरक होत असते.
रघुराजावरही शिमोल अंगण करण्याचा प्रसंग आला होता. रघु राजाकडे वर तंतूचा शिष्य कौत्स गुरुदक्षिणेसाठी सोन्याच्या 14 कोटी मोहरा मागायला आला होता. सर्व दक्षिणादान करून शरदाच्या मेघा प्रमाणे रघुराजांनीच कांचन झालेला होता. रघु राजाला वाटले, वेद विद्या उरत असणारे गुरुदक्षिणेसाठी आपल्याजवळ आला आणि तो रिकाम्या हाताने आपल्या अंगणातून परत गेला तर आपल्या सात पिढ्या लज्जित होतील. हा अध:पात: आपण होऊ देणार नाही.
रघुणे कुबेर, जो नेहमी धनसंग्रह करूनच बसलेला असतो त्याला सीमोल्लंघनाचे अल्टीमेटम पाठवले. घाबरून कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाळला. शमी वृक्षाने वैभव दिले म्हणून त्याचे पूजन होऊ लागले. पांडवांनी आपली दिव्य आसरे शमी वृक्षावर लपवून ठेवली होती म्हणूनही त्याचे महात्मे वाढलेले आहे.
रघुने शमी वृक्षावर पावसाच्या रूपात पडलेल्या सोन्याच्या मोहरा कौत्साला दिल्या. 14 कोटी पेक्षा अधिक घेणार नाही असा त्याने आग्रह धरला आणि तुझ्या निमित्ताने आलेली ही संपत्ती आहे तेव्हा अधिक झालेल्या संपत्ती नेहमी माझी तिजोरी भरणार नाही असा आग्रह रघुणे धरला. वैभव न घेण्यासाठी धरलेला आग्रह कदाचित केवळ भारतातच पाहायला मिळेल. ज्यादा असलेल्या सोन्याच्या मोहरा लोकांकडून लुटवील्या गेल्या.
सुवर्ण मोहरांचे प्रतीक म्हणून आम्ही शमी पूर्णानंतर शनीची पाने आपण एकमेकांना देतो. जे वैभव मिळाले आहे ते मी एकटा बघणार नाही, आपण सर्व मिळून बघूया. आपण वाटून खाऊ. केवढा उदात्त भाव दसऱ्याच्या दिवस म्हणजे समाजात असलेल्या दीन, हीन, लाचार तसेच भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा दिवस. बाह्य शत्रूबरोबरच आत बसलेल्या षडर रिपोर्टवर विजय मिळवण्यासाठी कृतनेच्याही बनण्याचा दिवस! दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शृंगार व पराक्रमाची पूजा! दसरा म्हणजे भक्ती व शक्ती यांचे पवित्र मिलन!
Comments
Post a Comment