नवरात्र

नवरात्र
    
नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्य केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत; तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते जगात तपश्चर्याला यश मिळते, ही गोष्ट सत्तेच्या उपासकाने विसरता कामा नये. तपश्चर्याच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत मूल्य देखील विजयी झाले आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची आंदुकल्पना देते. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार किंवा संस्कृती यांची कोणी पूजा करीत नाही.
    
अश्विन महिन्यात येणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच देवांना व मनुष्यांना 'त्राही माम' करून सोडले होते. दैवी विचारांचे प्रभा अस्पष्ट बनले होत व दैवी लोक परग्रस्त झाले होते. धैर्य घालून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्य प्रकल्पातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. सर्व देवाने जय जयकार करून ती सांभाळले, तेच पूजन केलं. तिला स्वतःच्या दिव्या आयोध्यांनी मंडित केले. या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. अश्रू वृत्तीला दाबून दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय दिले. ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा. ह्या दिवसात आईजवळ शक्ति मागायची व असुरी वृत्तीवर विजय मिळवायचा. आजही महिषासुर प्रत्येकाच्या हृदयात स्वतःचे स्थान जमून बसला आहे. आणि आत असलेल्या दैवी वृत्तींना गुदमरून सोडले आहे. ह्या महिषासुराच्या मायेला ओळखले पाहिजे. तिच्या असुरी जन्मापासून मुक्त होण्यासाठी आवश्यकता आहे, दैवी शक्तीच्या आराधण्याची! नऊच्या नऊ दिवस अखंड देपैवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस तेच नवरात्रीचे दिवस!
     
आपले भ्रांत समजूत आहे की, आसूर म्हणजे मोठ्या दाताचे, मोठ्या नाकांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस! खरे पाहता असूर म्हणजे 'आसुषू रमन्ते इति असुर:' प्राणातच रममान होणारे, भोगातच रममान होणारे. तसेच महेश म्हणजे रेडा. त्या दृष्टीने पाहता रेड्याचे वृत्ती बाळगणारे तो महिषासुर. रेडा नेहमी स्वतःचे सुख पाहतो. समाजात ही रेड्याची वरती पसरत चाललेले आहे. परिणामतः संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहित व भाव शून्य बनला आहे. समाजात आज व्यक्तिवाद व स्वार्थक पर्यंत अमर्याद बनून महिषासुर रुपात नाचत आहे. ह्या महिषासुराच्या नाकात व्यसन घालण्यासाठी आईजवळ सामर्थ्य मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्रीचे दिवस!
    
आपल्या वेदानेही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिलेले आहे. महाभारताचे पानं पान भलोपासना व शौर्य पूजा यांनी भरलेले आहे. व्यास भीष्म व कृष्णा यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, पुरुष व पराक्रम यांनी भरलेली आहे. महर्षी व्यासांनी पांडवांना शक्ती उपासनेचे महत्त्व समजावले आहे. त्यांनी पांडवांना उपदेश केला आहे की, तुम्हाला जर धर्माची मूल्य टिकवायचे असतील तर हात जोडून, बसून राहून चालणार नाही. शक्तीचे उपासना करावी लागेल. अर्जुनाला दिव्य आश्रप्राप्त करण्यासाठी व्यासांनी स्व स्वर्गात जाण्याचे सूचना केली होती.
     
अनाधिकाला पासून असुरी वृत्ती सद विचारावर, दहावी विचारावर मात करीत आलेली आहे, आणि दैवी विचार अडचणीत येतात देवाने भगवंता जवळ शक्ति मागितली आहे, सामर्थ्य मागितले आहे आणि असुरी वृत्तीचा पराभव केला आहे. केवळ सर विचार आहेत तेवढे पुरत नाहीत. त्यांचे रक्षण होण्यादेखील आवश्यक आहे. आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे.
    आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमाणांना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे. 'संघे शक्ति: कलौ युगे|'ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांचे संघटना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या संघटनेत प्रमुख स्थाने जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच आपल्याच शक्ती प्रगट होईल हे सुचविण्यासाठीच नवरात्राच्या दिवसात गरबा किंवा रास यांचा रूपात देवाच्या भोवती फिरायचं असतं. देवीच्या सभोवती फिरता फिरता तिला सांगितले पाहिजे की, 'माते! तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे. आमच्या संग बाळाच्या आड आमचा अहंकार येतो, आमची माई श्रुती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात त्यांना तू खाऊन टाक.'
    
आई जगदंबेची आपलीही उपासना नवरात्रात सुरू होते. पण ती केवळ नऊ दिवसापूर्वी सुमित राहू नये हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायला शक्ती प्रदान करेल.
    
नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. आईच्या पूजेचे दिवस. 'खा, प्या व मजा करा' अशा असुरी विचार श्रेणीवर विजय मिळविण्याचे दिवस. सांगशक्तीचे महत्त्व व भक्तीचे महत्त्व समजावण्याचे दिवस तसेच तपश्चर्याचा महिमा व एकटा यांचे महत्त्व समजावणारे दिवस! ह्या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगिताने भरून टाका.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन