नवरात्री दिवस 7 - Power to Accept

नवरात्री दिवस 7 - संतोषी माता 

आपण सर्वजण देवींचा महिमा पाहत आहोत. आपण खूप प्रेमाने दोन शब्द बोलतो माता( mother) आणि शक्ती (power). माता आणि शक्ती हे दोन वेगवेगळे शब्द आहेत की यांचा काही संबंध आहे ? शक्ती ही माता आहे, आणि माता ही आपलं पालन पोषण करते.

Power to Accept & Love -  सामावून घेण्याची शक्ती 
आज आत्मा जेव्हा कमजोर होऊन जाते तेव्हा त्या आत्म्याच्या इच्छा अपेक्षा कमी न होता आहे तशाच राहतात. पण जेव्हा आपण अपेक्षा करत राहतो करत राहतो तेव्हा आत्म्याची शक्ती ही घटत जात असते. म्हणूनच तर आपण मेडिटेशन करतो, मेडिटेशन करून जेव्हा आत्म्याची शक्ती वाढत जाते तेव्हा अपेक्षा ही कमी होत जाते. कोणती आत्मा कसं वर्तन करते ?  त्या आत्म्याचे वागणूक काय आहे ?  कशी आहे ? यावर चिंतन न करता आहे ती गोष्ट स्वीकारून पुढे जायचा. चिंतन करताना समस्यांवर चिंतन न करता योग्य विचारांवरच / संकल्पना वर चिंतन करावं. समस्यांवर चिंतन करायचंच नाही. का कसं कुठून यावर अजिबातही विचार करायचा नाही तर आत्ता आपण काय करायचं ?, कसं करायचं ?, याचा योग्य मार्ग कोणता ? यावर चिंतन चालू ठेवायच. 
"Focus on Solution not on Problems". 

Power to Accept - Understanding is the first step to acceptance, and only with ACCEPTANCE.
सामावून घेण्याचा प्रतीक हे संतोषी माते दाखवल जात. संतुष्टतेची देवी. जिथे सामावून घेण्याची शक्ती आहे तिथं संतुष्टता ही आलीच. 
संतोषी मातेच्या हातात तांदळाची वाटी दाखवली जाते, जी आत्मा संतुष्ट आहे ती त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या संस्कारांच्या आत्म्यांना एकत्रित करून एका वाटीत समान ठेवते. Means different people with different Sanskar. प्रत्येक तांदळाचा दाणा हा वेगळा आहे परंतु राहताना ते सगळे एकत्रच राहतात. यातच कारण असं की ती देवी ती शक्ती सर्व गोष्टी मान्य (accept) करून घेत आहे. 

My EGO holds on to "what should be" I accept " what is" and allow it to be releasing control. Learning to trust that there is a better way that will emerge if I allow it to be do so.
I use my Power to Aacept to overcome. That evils of stress and frustration.



Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन