नवरात्री दिवस 5 - Power to Discern
आपण देवींचा महिमा आणि त्यांच्या शक्तींचा चिंतन करत होतो. त्या अष्टभुजाधरी देवता म्हणजेच त्यांच्या आठ दिव्य गुण. प्रत्येक आत्मा मध्ये दिव्यता (Divinity) तेव्हाच येते जेव्हा ती आठ शक्तींचा वापर करत असतो त्यात एक शक्ती जरी कमी असली तरी ती पूर्ण होत नाही. या आठ शक्ती पैकी एक शक्ती जरी कमी असली तरी आपल्यात दिव्यता कमी जाणवते. दिव्यता म्हणजेच आठ शक्ती.
Power to Discern परखण्याची शक्ती
काय बरोबर, काय चुकीचं, काय सत्य, काय असत्य हे पाहून घेण्याची शक्ती त्याच आत्म्यात आहे जी आत्मा बाह्य वातावरणात कमी लक्ष देऊन Inner power's वर जास्त लक्ष देत असेल तर आपोआप आपल्याला परखण्याची शक्ती मिळून जाते. गोष्ट ओळखण्यासाठी त्याला वरून न पाहता त्या व्यक्ती, ती वस्तू, ती सिच्युएशन यामागील व्हायब्रेशन पहावे. आपण एकदी गोष्ट व्यवस्थित परखून घेतला तरच आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो म्हणून प्रत्येक आत्म्यात Power to Discern परखण्याची शक्ती असलीच पाहिजे.
पराखण्याची शक्ती आपल्याला दर्शवते गायत्री देवी. जी की बुद्धी ची देवता आहे. योग्य गोष्ट पाहून घेण्यासाठी बुद्धी ही तल्लख असली पाहिजे आणि हीच बुद्धी गायत्री देवीत आहे. गायत्री देवीलाच बुद्धीची देवी म्हटलं जातं.
गायत्री देवीच्या एका हातात सुदर्शन चक्र दाखवला जातो, सुदर्शन चक्र आपल्याला सांगतात की तुम्ही बाहेर न पाहता स्वतःवर वेळ द्या. स्वतः जेवढा तुम्ही स्वतःवर फोकस कराल तेवढे तुमचे व्हायब्रेशन्स high होणार. जेवढा आपण दुसऱ्यांवर विचार करणार तेवढे आपल्या व्हायब्रेशन्स कमी होत जाणार. म्हणजेच दुसरीकडे आपण आपली परखण्याची शक्ती घटवीत आहोत.
SwaDarshan Chakra indicates that Self- Realization. Self care, Self - Attention, Self - change.
दुसऱ्या हातात शंख दाखवला जातो. शंख आपण आपला आवाज दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरतो. आपल्याकडे पराखण्याची शक्ती असेल तर समोरील जगही आपलं ऐकण्याचे तयारी ठेवत. आपला प्रत्येक शब्द बरोबर आणि लोकांच्या कल्याणाचा आहे असा भाव लोकांमध्ये होतो हीच भावना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शंखाचा वापर केला जातो.
देवीसोबत हंस दाखवला जातो, हंसाचा कार्यच ते आहे योग्य ते परखून घेण्याचा, म्हणजेच हंस फिरताना त्याला खूप काही दिसतं. पण बाकी दगड-माती न घेता फक्त मोतीच घेतो. आपल्या अवतीभोवती वातावरणात म्हणूनच म्हटलं जातं की ही व्यक्ती हंस बुद्धी आहे. आपल्या लाईफ मध्ये प्रत्येक निर्णय हे खूप महत्त्वाचे असतात आणि आपण जर हाच निर्णय घेणं चुकलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्या नात्यात, आपल्या फॅमिलीत, आपल्या करिअरमध्ये.
So our Affirmation should be " I'm the soul, am Gayatri Devi, having the intellect of swan".
Comments
Post a Comment