गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महा सिद्धिविनायक म्हणतात. त्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया' आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो 'मोरया' म्हणजे नमस्कार या दृष्टीने पाहता, 'गणपती बाप्पा मोरया' चा अर्थ 'गणपती बाप्पाला नमस्कार' असा होतो.
शिवाय मोरेश्वर नावाचा गणपतीचा एक मोठा भक्तही होऊन गेला आहे. त्याच्या भक्तीमुळे त्याचं नाव प्रभू सोबत जोडले गेले. पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरातही 'ज्ञानबा तुकारामची' धून चालते.
मद् भक्तानां च ये भक्ता: ते मे प्रियतमा मता:|
माझ्या भक्ताचे जे भक्त ते मला सर्वात अधिक प्रिय वाटतात, असे प्रभूंनी गीतेत म्हटले आहे. म्हणूनच कदाचित हे मोरया चे नाव गणपती बरोबर जोडून दिले असावे.
गणेश चतुर्थी, गणपतीची चतुर्थ अवस्था, सूर्य अवस्थेपर्यंतच्या सिद्धीची जाणीव करून देते. ह्या दिवशी चंद्र पहायचा निषेध आहे. चंद्र हा मनाची देवता आहे. चंद्रमा मनसो जात:| चंद्र जसा वाढत घटत राहतो तसे मनही माकडासारखे नाचत- बागडत राहते तुर्या अवस्थेपर्यंत पोहोचू पाहणाऱ्या मानवाने मनाच्या चंचलतेच्या अधीन होता कामा नये. चित्त एकाग्र केले पाहिजे. मनाच्या तालावर नाचण्यात मानव जीवनाचा विकास नाही तर अधोपतन आहे, ही गोष्ट ह्या चंद्रदर्शनाच्या निषदामध्ये गर्भित आहे.
कोणतीही आई स्वतःच्या मुलाचे स्वरूप गणपती सारखे असावे अशी इच्छा करणार नाही, असे गणपतीचे स्वरूप आहे. तरी देखील आपल्या ऋषींनी गणपतीला खूपच महत्त्व दिलेले आहे. प्रत्येक शुभ कामात त्याचे प्रथम पूजन होते. विवाहाचा प्रसंग असो वा लक्ष्मीपूजनाचा, कोण शीला प्रसंग असो, की कुंभ स्थापनेचा समारंभ असो; अहो! मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठाही करायची असली तरी प्रथम पूजन गणपतीचेच. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा; पण आग्रह पूजन तर गणपतीचे झाले पाहिजे. पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्श्वला शेर शोधून आणण्यासाठी पाठवले. पार्षद जवळच जाऊन हत्तीचे मस्त घेऊन येतो आणि धडावर ते मस्त ठेवून गणपतीला सजीव केले जाते. गणपती गजानन बनतो. पचराणांची भाषा भाव गर्भित तसेच लक्षणा व रूपके यांनी भरलेले असते. बुद्धीशाली माणसाने स्वतःचे बुद्धी कशाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो आणि बालबुद्धीने ती गोष्ट वाचून आनंद प्राप्त करायचा असतो.
जर भगवान शंकराच्या हाताने हत्तीचे मस्तक घरावर बसवले जाते, तर गणेशाचे स्वतःचेच मस्त पुना का जोडले नाही? परंतु पुराने आपल्याला समजावतात की, गणपती हा तत्वज्ञानाची देवता व समाजाचा नेता आहे. तत्त्ववता व नेता यांच्याजवळ हत्तीचेच मस्तक असले पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्वे येतात किंवा सफल लोकप्रिय नेता बनू शकत नाही.
'गण-पती' म्हणजे समूहाचा पती; म्हणजे नेता. तो गुण-पती देखील असला पाहिजे. नेता व तत्वेता यांच्यात काय काय गुण असले पाहिजेत ते याच्या स्वरूपातून प्रदर्शित होतात. त्या दृष्टीने पाहता 'गण-पती' जवळ बाह्य सौंदर्य नसते तरी आंतरिक सौंदर हम आप वैभव असले पाहिजे.
गणपतीचे मस्त हत्तीचे आहे. अन्य कोण्या प्राण्याचे मस्तक न जोडता हत्तीचे मस्त त्याच्या झाडावर बसविण्यात एक आगळे वैशिष्ट्य आहे. हत्ती हा सर्व प्राण्यात सर्वांकडून आधी बुद्धिमान आहे. महान जीवनाच्या उंचीवर असलेल्या शिखराला गाठण्याचा प्रयत्न करणारा तत्वे इयत्ता बुद्धिमान असला पाहिजे; तसाच योग्य वळण देऊन समाजाला खऱ्या रस्त्याने नेण्याची अभिलाषा बाळगणारा नेता निर्बुद्ध असला तर कसा चालेल?
याप्रमाणे नेता व तत्वेता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता व दुसऱ्यांना जेवू घालण्याची उदारता असली पाहिजे. याचे येथे दिग्दर्शन आहे. हत्तीचे कान सुपा सारखे असतात. सुखाचा गुण कोणता? 'सार सारखं ग्रहीलाई और थोया देई उडाये' सो फलकटे फेकून देऊन स्वच्छ धान्य स्वतः जवळ ठेवते. बोलणे सर्वांचे सर्व ऐकावे पण त्यातले सार ग्रहण करून बाकीचे तत्व नसलेल्या गोष्टी सोढून द्या. मोठे कान उत्तम श्रवण भक्तीचेही दिग्दर्शन आहेत.
गणपतीचे अति सारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म-दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्याएवढे सूक्ष्मदृष्टी हत्तीचे असते. मानवाने ही स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडविले पाहिजे. हत्तीचे बारीक डोळे दीर्घ दृष्टी देखील सुचवतात. या दीर्घ दृष्टीने हत्ती व्यक्तीचे भविष्य वाचू शकतो, असे आपल्या येथे समजूत आहे. म्हणूनच तर जुन्या काळात कोणी बेवारस राजा मेला असेल तर हत्तीनीच्या सोंडेत माळ देऊन तिला फिरवीन. ज्याच्या वेळात हत्तीन माळ घालीन त्याला राजा बनवीत असत.
हत्तीचे लांब ना क दूरपर्यंत पोहायला समर्थ असते. नेता व तत्वेता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचेही सोंड सूचक आहे गणपतीला दोन डोळे आहेत. गणपतीला दोन सुळे असतात. एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो. पूर्ण श्रद्धेचा व अर्धा बुद्धीचा आहे. जीवन विकासासाठी आत्मश्रद्धा व ईश- श्रद्धा पूर्ण असली पाहिजे. बुद्धीही थोडी कमी असले तरी चालेल. पण स्वतःवर तसाच प्रभू वर थोडासा जरी कमी विश्वास असला तरी चालणार नाही.
गणपतीला चार हात आहेत. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पास, दुसऱ्या हातात मोदक आहे व चौथ्या हाताने आशीर्वाद देत आहे. अंकुश वासना- विकारावर संयमाची गरज आहे असे सुचवितो तर पाश, गरज पडता चेहऱ्यांना किंवा अनुयायांना शिक्षा करण्याचे सामर्थ्य देखील तत्त्ववेत्ता व नेता यांच्याजवळ असले पाहिजे याची सूचना देतो. मोदक म्हणजे जो मध देतो तो. ज्याच्यामुळे आनंद प्राप्त होतो, संतोष होतो असा सातवीत आहार या महापुरुषांचा असला पाहिजे. याचा अर्थ दाखवून देतो की, प्रत्येक इंद्रियांचा आहार सात्विक असला पाहिजे. शिवाय मोदक हे तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या बाहेरच्या पापुद्राप्रमाणे तत्त्वज्ञान देखील वर वर ने बाहेरून चाकणारा अण्णा ठिपके लागते. परंतु आतील सारभाग मधुर असतो. जे स्वतःच्या कर्माचा फळरूपी मोदक प्रभूच्या हातात ठेवतात. त्यांना प्रभू आशीर्वाद देतो असे चौथा हात सुचवितो. केव्हा केव्हा असेही घडते की, जसे भगवान विष्णूने भक्ताच्या पूजनासाठी स्वतःच्या हातात कमळ धारण केलेले आहे तसा स्वतःच्या लाडक्या मुलांना भरविण्यासाठी गणपतीने हातात मोदक ठेवलेला आहे व दुसऱ्या हाताने तो त्यांना बोलावीत आहे.
त्याला लंबोदर म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उधरात साठवून ठेवल्या पाहिजेत, याची सूचना त्याचे मोठे पोट करीत असते. सारांश, माणूस घागर पोटाचा नाही तर सागर पोटाचा असला पाहिजे. सागराप्रमाणे तो स्वतःच्या पोटात अनंत गोष्टींना सामावण्याची शक्ती असलेला असला पाहिजे. त्याचे पाय लहान आहेत. त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. 'उतावळा स्वभावरा और धीरसो गंभीर' हा म्हणेचा पाठ शिकून तो असे सुचवीत आहे की, कोणत्याही काम करताना उतावीळ होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे पुढे जाणारा चे कार्य सुदृढ व सफल बनत जाते. शिवाय लहान तोकडे पाय बुद्धिमत्तेचे लक्षण आहेत. बुद्धिमानाचे पाय नेहमी तोकडे असतात. म्हणजे ते स्वतः धावत नाहीत. तर स्वतःच्या बुद्धीने दुसऱ्यांना धावतात. पृथ्वी प्रदक्षिणेच्या शर्यतीत गणपतीने स्वतःचा बंधू कार्तिकेय त्याच्यावर स्वतःच्या बुद्धीनेच मात केली होती ही पौराणिक गोष्ट आपल्याला माहित आहे.
गणपतीचे वाहन उंदीर आहे. तसेच विष्णू चव्हाण गरुड आहे. शंकराचे वाहन नंदी आहे. ही सर्व वाहने एवढे विशाल काय आहेत की, ते दरवाजापर्यंत जाऊन अडकतात. घरात प्रवेश आहे करू शकत नाही. पण गणपतीचे वाहन उंदीर असे आहे की, ते त्याला घराघरात घेऊन जाते. महापुरुषांची साधने असे लहान व नम्र असली पाहिजेत की, जेणेकरून ते घराघरात प्रवेश प्राप्त करू शकतील. सर्वांना प्रिय बनू शकतील. दुसरी एक व्यवहार नीती देखील उंदराकडून शिकण्यासारखी आहे. तो चावतो ही खरी गोष्ट आहे पण तो फुंकर घालून चालतो. त्यामुळे तो चावला हे कोणाला कळत नाही. नेता किंवा तत्वे येतात याच्यावर कधी कान पकडण्यासारखे कडू बोलण्याचा प्रसंग आला तर ते इतक्या गोडपणे सांगतात की, ऐकणाऱ्याला वाईट किंवा खोटे वाटत नाही आणि स्वतःच्या कार्य देखील होऊन जाते.
उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे. उंदराप्रमाणे माया देखील मानवाला फुंकर मारून चावत असते. कोण कोण चावणाऱ्या ह्या मायेला फक्त ज्ञानी तत्त्वज्ञानेच अंकुश यामध्ये ठेवू शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला खूप सूचक गोष्टी समजावते.
गणपतीला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही, असे गवत त्याने स्वतःच मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्त्वेता, ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे, ध्रुवांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहित, सुगंध विरहित; ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही असे कर्म देखील प्रभूच्या नावावर प्रेमाने वाहिले तरी ते त्याला आवडते.
गणपतीला लाल फुल प्रिया आहे. लाल रंग क्रांतीचा सुचक आहे. नेता व तत्वेता यांना दैविक्रांती प्रिय असते; हे स्वाभाविक आहे. शिवाय गणपतीला आपण तांदूळ वाहतो. तांदुळाला संस्कृततात 'अक्ष का' म्हणतात. 'अक्षत' म्हणजे जो तुटलेला नाही असा; जो खंडित नाही तर अखंड आहे. देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे.
गणपतीला 'वक्रतुंड' म्हणतात. रिद्धी सिद्धी पासून मूग फिरून राहणारा लाच रिद्धी सिद्धी मिळतात. वाकडे-तिकडे चालणारा, ला आडव्या रस्त्याला जाणारा जो दंड देतो तो वक्रतुंड. अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गन आहे. ह्या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धेश लिहायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पुजण्याचा अर्थ असा की, मनाला कार्याच्या प्रारंभपूर्वी शांत व स्थिर करायचे; ज्याच्यामुळे काही वेगळे उभी न व्हावेत व कार्य सरळपणे पार पडावे.
गणेश- चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो. जे शांत आहे त्याला आनंतात, साकाराला निराकारात व सगुनाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्ती पूजेपासून सुरुवात करून तत्व पूजेत त्या आरंभाचे आपण परिवार असं केलेले पाहिजे. शेवटी आपण तत्वच प्रमाण मानले आहे. सारांश, गणपतीचे विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ. सर्वात भगवान पहाणे आपल्याला कदाचित कठीण जात असेल तर सर्व भगवंताच्या आहेत, म्हणून माझे बंधू आहेत, आपले सर्वांचे दैवी नाते आहे एवढे तर आपण अवश्य समजू शकतो.
ॐकाराला पदार्थ सृष्टी मध्ये आणायचं काम गणपतीच्या मूर्तीने केले आहे, असे देखील महान लोकांचे म्हणणे आहे. अकार चरण युगल| उकार उदर विशाल| मकर महामंडल| मस्तकाकरे| 'अ'कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, 'उ'कार म्हणजे विशाल पोट 'म'कार म्हणजे त्याचे मस्तक. अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे.
घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ एकता व संघटनेच्या भावनेने करण्यात आलेला आहे. ध्येय मूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश, नेता व तत्ववेत्ता यांचे आदर्श रूप आहे.
ज्या ऋषींनी गणपती- पुजनाद्वारे जीवनाचे असे अलौकिक दर्शन घडविले तसेच ते दर्शन जीवनात साकार करून आनंत विघ्ने पार करण्याचे सामर्थ्य दिले, त्या ऋषींना आपले अनंत प्रणाम.
Comments
Post a Comment