जीव शिवाचा लपंडाव
जीव आणि शिव यांच्यात चाललेला लपंडाव
ब्रह्मविद् म्हणजे या जगात मी आलो आहे तो ब्रम्हाला ओळखण्यासाठी. या सृष्टीत काही गडबड गोंधळ नाही. की अव्यवस्थित नाही. एवढी सुव्यवस्थेत सृष्टी निर्माण करणारी कोणती तरी शक्ती असली पाहिजे. कोणाचे डोळे वर आहेत तर कोणाचे खाली पायात आहेत असे अजून पर्यंत झालेले नाही. अशी सुव्यवस्थित रचना करणारी, अजब लीला निर्मिणारी कोणती तरी शक्ती असली पाहिजे. ती शक्ती म्हणजे ईश्वर.
ईश्वरशक्ती आणि जीव या दोघांचा चाललेला हा लपंडावाचा खेळ आहे. हा खेळ जेव्हा पुरा होईल तेव्हा होईल, परंतु सुरुवातीला ईश्वरी सत्तेवर उभा राहिलेला, ईश्वराच्या मांडीवर बसून जीवन जगणारा हा जीव आहे. सुरुवातीच्या पायरीला जीव व ईश्वर भिन्न असतात, वेगळे असतात. वस्तुतः जीव हा ईश्वराचा अंश आहे
ईश्वर सत्य आहे. ईश्वर प्रामाणिक आहे, जीव अप्रामाणिक आहे. ईश्वर शिव आहे म्हणजे सर्वांचे कल्याण करणार आहे, जीव अशिव आहे. स्वतःचा स्वार्थ आला की दुसऱ्याला त्याने पकडलेच. ईश्वर सुंदर आहे, जीव असुंदर आहे. स्वतःच्याच स्वार्थासाठी धावणारा जो आहे त्याचे रूप कसे असेल?
Comments
Post a Comment