त्रिकाल संध्या - भगवंतापर्यंत पोहचण्याची पहिली पायरी.

  Most Practical
      
विचारात बदल झाला की व्यक्ती सैतान पण बनवू शकते. तशीच विचार बदलल्यावर व्यक्ती माणूस पण बनू शकते. दोन्हीही घडू शकत. पण हे सगळं करण्याकरता व्यक्तीचा आत्मगौरव उभा करावा लागेल. आणि हे आपल्याला करायचं आहे. इकडे जे साहेब लोक आहेत, मोठे आहेत त्यांना किंमत मिळते. कुणी डॉक्टर आहेत, कुणी जज आहे, साॅलिसीटर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी मंत्री आहे, सगळ्यांना किंमत आहे; फक्त मलाच किंमत नाही. माझ्याजवळ काहीच नाही. ना विद्या, ना वित्त आणि मिळण्याचा स्तंभ पण नाही. मग कशाचा गौरव ठेवू! म्हणून एकच रस्ता आहे तो म्हणजे त्रिकाल संध्या.
      
जर भगवंताला स्विकाराल तर समाजातला शेवटचा माणूसही उभा राहू शकेल. आहो त्याच्यात पण तुमच्यासारखं कर्तुत्व आहे, तो करू शकतो पण या लोकांच्या दृष्टीने तो मेला आहे. माणसाला समजवा, बुद्धीने समजवा. अरे तू विश्वाचा पहिला नागरिक आहेस. तू डोळे उघडतोस ना तेव्हा सृष्टी सुरू होते. तोपर्यंत सृष्टी नसतेच. अरे! तुझ्या डोळे बंद असतात तेव्हा सृष्टी असते? अशी शेखी बाळगाल तर आत्मगौरव येईल, शक्ती वाढेल. आत्मगौरवामुळे त्याच्यात आत्मविश्वास येईल. हे सगळं होईल पण आम्ही काय केलय माहित आहे, सगळ्याच क्षेत्रात मग ते राजकीय असो, आर्थिक असो कोणालाच देऊ नकोय. हे भगवंताला सोडून यांना साऱ्या समस्या सोडवायचा आहेत. देव सोडून! हे most practical लोक होत! भगवंताला सोडणारे most practical व्यक्तीच आहेत.


Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन